टिपा लिहा श्वेतक्रांती

टिपा लिहा श्वेतक्रांती

 

प्रश्न 

टिपा लिहा श्वेतक्रांती


 उत्तर 

 

i) काही वर्षांपूर्वी भारतात दुधाचा आणि दुग्धोत्पादनाचा तुटवडा भासत असे. काही प्रदेशांत दुधाची विपुलता होती. परंतु देशभरातल्या ग्राहकांपर्यंत ते पोहोचू शकत नव्हते. 

ii) डॉ. वर्गिस कुरियन या आणंद सहकारी दुग्धोत्पादन केंद्राच्या संस्थापकांनी सहकार चळवळीच्या मार्गाने ऑपरेशन फ्लड' ही दूधगंगा सुरू केली. याबाबतीत जैवतंत्रज्ञानाचे साहाय्य घेतले गेले. 

iii) डॉ. कुरियन यांच्या प्रयत्नांनी भारताच्या दुग्धोत्पादनात भरीव वाढ झाली आहे, यालाच श्वेतक्रांती असे म्हटले जाते.

iv) दुग्धजन्य पदार्थ व दूध यांच्या गुणवत्तेवर नियंत्रण, नव्या उत्पादनांचा शोध आणि दुग्धजन्य पदार्थांचे योग्य परिरक्षण यांविषयीच्या पद्धती सुधारल्या गेल्या. अमूलचे [AMUL - (Anand Milk Union Limited)] नाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जाते.


Previous Post Next Post