प्रश्न | टिपा लिहा हेमाडपंती शैली |
उत्तर | i) महाराष्ट्रातील बाराव्या-तेराव्या शतकातील मंदिरांना 'हेमाडपंती मंदिरे' असे म्हणतात. ii) हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंती अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छाया प्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. iii) हेमाडपंती मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतोदगडांमध्ये एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. या प्रकारच्या शैलीला हेमाडपंती शैली असे म्हणतात. |