फरक स्पष्ट करा भारतातील मासेमारी व ब्राझीलमधील मासेमारी

फरक स्पष्ट करा भारतातील मासेमारी व ब्राझीलमधील मासेमारी

फरक स्पष्ट करा भारतातील मासेमारी व ब्राझीलमधील मासेमारी 

उत्तर :


 भारतातील मासेमारी 

 ब्राझीलमधील मासेमारी 

 

i) भारताला ब्राझीलपेक्षा जास्त म्हणजे ७५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

ii) भारत हा देश खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये अग्रणी आहे.

iii) भारतामध्ये पारंपरिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय केला जातो.

iv) भारतात हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र या तिन्ही भागांना सागरी किनारा लाभला आहे.

 

i) ब्राझीलला भारतापेक्षा कमी म्हणजे ७४०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

ii) ब्राझील या देशात फक्त खाऱ्या पाण्यातील मासेमारी विकसित झाली आहे.

iii) ब्राझीलमध्ये वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून मासेमारी केली जाते.

iv) ब्राझीलला उत्तर अटलांटिक महासागर व दक्षिण अटलांटिक महासागर यांचा सागरी किनारा लाभला आहे.


Previous Post Next Post