संकल्पना स्पष्ट करा माहितीचा अधिकार

संकल्पना स्पष्ट करा माहितीचा अधिकार

 

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा माहितीचा अधिकार

 उत्तर 


i) शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी २००५ साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला.

ii) गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. 

iii) शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत, याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. 

iv) माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे.



Previous Post Next Post