इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते

इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते

प्रश्न

 इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

उत्तर

 

 

 i) इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात.

ii) प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारीही वेगवेगळी करावी लागते.

iii) या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे, हे माहीत असले पाहिजे.

iv) प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत; म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

 


Previous Post Next Post