साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे

साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे

साम्राज्यवादाची कारणे 

साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे

साम्राज्यवादाची कारणे लिहा 

प्रबोधन चळवळीतून आकारास आलेल्या युरोपीय राष्ट्रांमध्ये आधुनिक साम्राज्यावादाची लालसा निर्माण झाली. या लालसेतूनच 1914 पर्यंत संपूर्ण आशिया खंड व आफ्रिका खंड आपल्या वर्चस्वाखाली आणला. सतराव्या शतकापासून सुरू झालेल्या साम्राज्यवादाला अनेक घटक कारणीभूत ठरले. 

1) वैज्ञानिक शोध : जॉन के पासून राईट बंधूंपर्यतच्या संशोधकांनी लावलेल्या अद्भुत शोधांमुळे मानवी जीवन गतिमान झाले. बाष्पशक्ती, विद्युतशक्ती, कोळसा, लोखंड या शोधांमुळे वाहतुक व दळणवळण क्षेत्रात प्रचंड गतिमानता आली. विज्ञानाने आधुनिक शस्त्रांचीही निर्मिती केली. विज्ञानामुळे मानवातील अति महत्त्वाकांक्षा जागी झाली. त्यामुळे अनेक राष्ट्रांमध्ये साम्राज्यवाद वाढीस लागला. 

2) ओेदयोगिक क्रांती : दयोगिक क्रांतीमुळे आधुनिक साम्राज्यवादाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. यंत्रामुळे उत्पादनाचा वेग वाढला. मालाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे तयार झालेल्या मालाची देशांतर्गत विक्री होणे अशक्य झाले. त्यातून नवीन बाजारपेठांचा शोध सुरू झाला. 

3) कच्चा मालाची आवश्यकता : ओेदयोगिक क्रांतीमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. कच्चा माल कमी पडू लागला. युरोपीय राष्ट्रांमध्ये स्वत:चा माल विकण्याची स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर आपला माल स्वस्त किंमतीत विकणे आवश्यक होते. त्याकरिता उत्पादनखर्च कमी करणे आणि कच्चा माल स्वस्त दरात मिळवणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. कच्चा माल मिळविण्याकरिता वसाहत हेच चांगले साधन होते. यासाठी युरोपीय राष्ट्रे आशिया व आफ्रिका खंडांकडे वळली. 

4) आशिया, आफ्रिका खंडांची संपन्नता : आशिया, आफ्रिका खंडांतील राष्ट्रे नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न होती. सोने-चांदी, हिरे, लोखंड, कोळसा या खनिज पदार्थाचे साठे आफ्रिका खंडात वीपुळ प्रमाणात उत्पादन होत होते. या भूभागातील वसाहती आपल्या ताब्यात असल्यास तेथील खनिज संपत्ती आपल्या मालकीची होईल. त्यातून आपणास प्रचंड फायदा मिळवता येईल आणि आपला देश आधिक संपन्न होईल. या भूमिकेतून युरोपियन राष्ट्रे आशिया व आफ्रिका खंडाकडे वळली. 

5) युरोपातील नवोदित राष्ट्रे : एकोणिसाव्या शतकात जर्मनी व इटली यांचे एकीकरण होऊन ही नवीन राष्ट्रे उदयास आली. इंग्लंडसारख्या राष्ट्राचे प्रचंड साम्राज्य असावे व आपल्याकडे वसाहती नसाव्यात याची नवोदित राष्ट्रांना खंत वाटू लागली. ही राष्ट्रे वसाहती मिळविण्यासाठी प्रयत्नशील झाली. त्यांनी आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. जर्मनी इटलीच्या साम्राज्यवादी स्पर्धेमुळे जगात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. युरोपात नव्याने उदयास आलेल्या राष्ट्रांमुळे साम्राज्यवाद वाढीस लागला. 

6) राजकीय वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा : वसाहती जिंकून घेणे आणि त्या दीर्घकाळ आपल्या ताब्यात ठेवणे, यासाठी त्या वसाहतींचे संरक्षण करण्याची आवश्यकता होती. सागरातील आणि जमिनीवरील लष्करी ठाणी जिंकून घेण्याची स्पर्धा युरोपीय राष्ट्रांमध्ये सुरू झाली. आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा वाढावी, यासाठी युरोपीय राष्ट्रे साम्राज्यविस्तार करू लागली. एखादया देशाचे मोठेपण त्याच्याताब्यात असलेल्या वसाहतींवरून ठरू लागले. या साम्राज्यवादाच्या विकासातून युरोपीय राष्ट्रांमध्ये परस्परांविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक राष्ट्र आपल्या रक्षणाची जय्यत तयारी करू लागले. त्यातून वसाहती मिळविण्याची स्पर्धा वाढतच गेली. 

7) धर्मप्रसार : ख्रिस्ती धर्माचा प्रसार जगभर व्हावा अशी युरोपियनांची इच्छा होती. त्यांचा धर्म व संस्कृती जगात सर्वात श्रेष्ठ आहे. अशी त्यांची समजूत होती. इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवले ते हाती 'तराजू व बायबल' घेऊन, यातील तराजू हे व्यापाराचे व बायबल हे धर्म प्रसाराचे प्रतीक होते. वसाहती स्थापन केल्यानंतर अनेक धर्मप्रसारक तेथे पोहोचले. धर्माच्या प्रसारासाठी अनेक मिशन स्थापन झाल्या. त्यातून साम्राज्यवाद वाढीस लागला. 

8) आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांचा दुबळेपणा : ज्या काळात आधुनिक साम्राज्यवादाचा विकास होत होता, त्याकाळात आशिया व आफ्रिका ही खंडे विस्ताराने मोठी होती. परंतु मध्ययुगातील अनेक आक्रमणे, सरंजामशाही, शेती, व्यापार उदयोगाचा ऱ्हास यामुळे राजकीय व आर्थिकदृष्टया दुबळी व मागासलेली होती. धर्म, पंथ, भाषा यांच्यामध्ये समाज विभागला गेला होता. त्यामुळे वैज्ञानिकदृष्टया प्रबळ असलेल्या युरोपीय राष्ट्रांनी या दुबळेपणाचा फायदा घेतला. युरोपीय रक्षत्रांनी त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले.

Previous Post Next Post