इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे, यासाठी किमान ६ उपाय सुचवा

इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे, यासाठी किमान ६ उपाय सुचवा

प्रश्न

 इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे, यासाठी किमान ६ उपाय सुचवा. 

उत्तर

 

 

इतिहासाच्या साधनांत लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात :

i) किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी

ii) वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे या कृती टाळण्याबाबत उपाय योजावेत. 

iii) ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू सावधतेने हाताळाव्यात. त्यांची चोरी केली होणार नाही याची काळजी घ्यावी. 

iv) ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्य संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे.

v) प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यांमुळे बुरशी लागते. म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा.

vi) या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत.

vii) या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन सामाजिक प्रबोधन करावे.

 

Previous Post Next Post