प्रश्न | उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ? |
उत्तर
| इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. या इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो - i) भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो. ii) आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते. iii) उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना घेणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय