विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते

विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते

प्रश्न

 विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते.

उत्तर

 

 

i) मराठी नाटकांचा उदय कीर्तन, भारुडे, दशावतारी खेळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ यांतून झाला.

ii) लळिते आणि लोकनाट्ये यांत मराठी नाटकांची बीजे रोवली गेली.

iii) १८४३ साली विष्णुदास भावे यांनी 'सीतास्वयंवर' या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर केला. हे पहिले नाटक त्यांनी स्वतःच रचले होते. त्यानंतर महाभारतातील. कथानकावरही त्यांनी नाटक रचले.

iv) गावोगावी दौरे करून आपल्या नाटकांचे प्रयोग केले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इत्यादी सर्व कामेही तेच करीत असत. 

नाट्यप्रयोगाची निश्चित एक संकल्पना विष्णुदास भावे यांनी निर्माण केली. त्यामुळे त्यांना 'मराठी रंगभूमीचे जनक' म्हणून ओळखले जाते.


Previous Post Next Post