न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे

न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे

प्रश्न

 न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे ?

उत्तर

 

 

न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली.

i) घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन या कायदयांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

ii) वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली.

iii) प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली.

iv) खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रदबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी जुलमी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले.


Previous Post Next Post