मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते

प्रश्न

 मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते.

उत्तर

 

 

i) मेजर ध्यानचंद हे त्या वेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते.

ii) त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्णपदके मिळवून दिली.

iii) १९३२ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जपानविरुद्ध २५ गोल केले.

iv) आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत ४०० च्या वर गोल केले.

म्हणून, त्यांच्या हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना ' हॉकीचे जादूगार' असे म्हटले जाते.


Previous Post Next Post