इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान स्पष्ट करा

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान स्पष्ट करा

प्रश्न

 इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान स्पष्ट करा.

उत्तर

 

 

भाषाशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र आणि इतिहासलेखन यांत मूलभूत संशोधन करणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे - 

i) 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले.

ii) इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार मांडला.

iii) केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती म्हणजे इतिहास नव्हे, असे त्यांचे मत होते.

 iv) आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला.

v) अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.

vi) स्थल काल व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहासलेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते.

 

Previous Post Next Post