अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा

अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा

प्रश्न

 अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा. 

उत्तर

 

 

i) रासायनिक अभिक्रियेमध्ये पदार्थामधील रासायनिक बंधांचे विभाजन होते व नवीन रासायनिक बंध तयार होतात व पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात, त्यांना अभिक्रियाकारके किंवा अभिकारके म्हणतात. 
ii) रासायनिक अभिक्रियेत नवीन बंध तयार होऊन जो पदार्थ नव्याने तयार होतो, त्याला उत्पादित म्हणतात. 
iii) उदा., कोळसा (कार्बन) हवेत जाळला असता, कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. ही रासायनिक अभिक्रिया आहे. यात कोळसा (कार्बन) व ऑक्सिजन (हवेतील) हे अभिकारक आहेत, तर कार्बन डायऑक्साइड हे उत्पादित आहे. 

Previous Post Next Post