आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती

आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती

प्रश्न

 आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर

 

 

आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये -

i) या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते.

ii) हे प्रश्न भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा-कहाण्यांशी जोडलेला नसतो. 

iii) या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते.

iv) मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो.



Previous Post Next Post