तुम्ही राहत असलेल्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागली आहे. बचावासाठी कोणत्या उपाययोजना कराल

तुम्ही राहत असलेल्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागली आहे. बचावासाठी कोणत्या उपाययोजना कराल

प्रश्न

 तुम्ही राहत असलेल्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागली आहे. बचावासाठी कोणत्या उपाययोजना कराल ?

उत्तर

 

 

इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागलेली असताना बचावासाठी पुढील उपाययोजना करू :

i) इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागलेली असल्याने इमारतीबाहेर पडण्याची घाई करणार नाही. ते धोकादायक ठरेल. म्हणून तत्काळ अग्निशमन दलाला फोन करून बोलावीन.

ii) आजूबाजूच्या लोकांना हाका मारून सतर्क करीन. मदतीसाठी बोलावीन. 

iii) नाकावर आणि तोंडावर भिजवलेला ओला फडका ठेवीन आणि दुसऱ्यांना देखील तसे करायला सांगीन, म्हणजे कोणी धुरामुळे गुदमरून जाणार नाही.

iv) इमारतीबाहेर पडण्यासाठी निराळा मार्ग तयार करीन आणि इमारतीबाहेर पडून  आग विझवण्यासाठी मदत करीन. 

v) वैदयकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न करीन.

Previous Post Next Post