ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोन याविषयी माहिती लिहा

ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोन याविषयी माहिती लिहा

प्रश्न

 ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोन याविषयी माहिती लिहा

उत्तर

 

 

i) ब्राझीलमधील अजस्त्र कड्याद्वारे ईशान्य अटलांटिक महासागरावरून आग्नेय व दिशेत वाहणारे व्यापारी वारे अडवले जातात. 

ii) या अडथळ्यांमुळे ब्राझीलमधील पूर्वकिनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. 

iii) ब्राझीलमधील अजस्त्र कड्याच्या वाऱ्यांच्या दिशेला असणाऱ्या किनारपट्टीच्या भागात सुमारे वार्षिक सरासरी १२०० मिमी पर्जन्य पडते.

iv) परंतु, ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे ईशान्य भागात या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. 

v) ब्राझीलमधील ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो. ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. 

vi) ब्राझीलमधील ईशान्य भागात केवळ वार्षिक सरासरी ६०० मिमी पर्जन्य पडते. 

vii) या शुष्क प्रदेशास पर्जन्यछायेचा प्रदेश' किंवा 'अवर्षण चतुष्कोन' असेही संबोधतात.

viii) या प्रदेशात सरासरी तापमानही जास्त आढळते.

Previous Post Next Post