चांदणभूल या ललित लेख संग्रहाचे कथानक थोडक्यात लिहा

चांदणभूल या ललित लेख संग्रहाचे कथानक थोडक्यात लिहा

चांदणभूल’ या ललितलेखसंग्रहातून निसर्गाचे वर्णन व शेतीची पारपरिक पध्दतीचे वर्णन विजयनुसार मिठे यांनी कसे केले ? ते लिहा.

किंवा

 चांदणभूल’ या ललितलेखसंग्रातून विजयनुसार मिठे यांनी निसर्गातील ‘चांदोबा’ व ‘शेतीतील खळे’ ही दोन्ही प्रतिकांचे वर्णन कसे केले ? ते लिहा ?

किंवा

चांदणभूल’ या ललित लेखसंहातून संग्रहातून लेखकांनी निसर्ग सोदर्याचे चित्रण कसे केले ? ते लिहा ?

किंवा

चांदणभूल’ या ललित लेख संग्रहाचे कथानक थोडक्यात लिहा ?

चांदणभूल’ हा ललितलेखसंग्रह विजयकुमार मिठे यांच्या चांदणभूल’ या ललितलेखसंग्रहातून घेतला आहे. स्वत: निवेदक लहानपणाच्या आठवणी सांगताना चांदोबा, शेतीतील खळे, गावगाडा, निसर्ग याचे दर्शन प्रामुख्याने या प्रस्तूत लेखसंग्रहात आले आहे.

निवेदकाची आई लहानपणी ‘चांदोमामा चांदोमामा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागं लपलास का ?’ असे अंगाई गीत गाऊन चांदोबाची ओळख करून देते. चिऊ-काऊची गोष्ट ती सांगते. तेव्हापासून पक्षांचा आणि निसर्गाचा चांदोमामाचा व चांदण्याच्या आभाळाचा लळा लागलेला होता. त्यामधून लेखकाची बालवृत्ती ही निसर्गातील सूक्ष्म गोष्टीचे निरीक्षण करणे ही होती. शाळेला सुट्या लागल्यानंतर शेतामध्ये गहू सोंगून त्याचे पाथरे खळ्यावर ‘खेडमेढी; भवती पसरलेले असायचे. त्याची राखण शेतामध्ये होत असे. निवेदक हा लहानपणीच आपल्या काका (चुलत्या) बरोबर शेतामध्ये रात्री जागल करण्यासाठी जात असतो. तेव्हा तो चवथी-पाचवीलाच होता. 

निवेदकाला शाळेपेक्षा खळ्यामध्येच खूप गंमत वाटायची म्हणजेच आपल्या खळ्या बरोबर दुसऱ्याचेही खळे एकमेकांच्या गळ्यात गळा घालून बसलेले त्यामुळे सर्वजण शेतामध्ये रात्रीला असायचे. प्रत्येक खळ्यावर गव्हाच्या पेंढ्या गव्हाचे पाथरे पडलेले असल्याने कुणी ना कुणीतरी शेतावरील खळ्याचे रक्षण करण्यासाठी शेतात येत होते. रात्रीच्या वेळेच्या चुलत्या सोबत गावकुत्रा पण सोबत असतो. खळ्यावर आल्यानंतर तात्या खेडमेढीवर ठेवलेल्या 'झेऱ्या' गव्हाच्या पाथऱ्यावर अंथरायचा आणि कंदिलाची वात बारीक करून दिवसभर शेतात राबल्यामुळे तो लवकरच झोपी जात असे; पण निवेदकाला मात्र विलक्षण आवड होती ती म्हणजे लहानपणी आईने चांदोबाची जी गोष्ट सांगितली त्या गोष्टीचा शोध घेण्याची आभाळातील चांदोबा व चांदण्याशी संवाद करत अंथरूणावर पडतो. 

चांदोबाचे विलक्षण महत्त्व हे की, "शितल प्रकाशापेक्षा त्याच्यावर काळे डाग कशाचे आहेत" याचे कुतूहल वाटायचे. ते डाग कधी झाडाच्या आकाराचे तर कधी एखाद्या रथासारखे दिसायचे. तसेच चंद्राच्या बाजूला काही अंतर राखून चमकणाऱ्या ठळक चांदोबाचे पाहिजे की, वाटायचे ही चांदोबामामीच आहे. कारण माझे आणि चांदोबाचे नाते म्हणे मामाभाच्याचे होते. खूप दाट बारीक चांदण्यांचा पुंजकाही दिसायचा. हे निरीक्षण करताना झोपमात्र उशीरानं लागायची. थंडीनं कुडकुडताना जाग आली की, पुन्हा आभाळाकडे नजर जायची. रात्री निसर्गातील चांदीण्यांनी चमचमणार आभाळ निस्तेज वाटायचे. 

माझे मित्र आजूबाजूच्या खळ्यावरून एकत्र जमतो की, तात्या आम्हाला भूताखेतांच्या गोष्टी सांगतांना खूप भिती वाटायची. त्यामुळे आम्ही एकमेकांना चिकटून बसायचो. आभाळतले तीकांड, चार चांदण्याचे बाजू, विंचू आणि पहाटेचा तारा 'सुक' म्हणून याचे विलक्षण आनंद वाटायला दिवसभर मळणीचे काम बेेलाची पात गव्हाच्या व ज्वारीचा कणसातून दाणे मोकळे व्हायचे. तिसरा प्रहारापर्यंत उपणणीसाठी 'मदन' तयार होत होते. रात्रीच्या चंद्रप्रकाशात उपणवट चालायची तेंव्हा एखाद्या उंच असलेलं दिसायचं आणि त्यातच रात्रीचा गार वारा अंगाला झोबांयचा. तिवईवर उभं राहून उपणंताना वारा मंदावला की जेवणासाठी माणसे बसायचे त्यावेळी चंद्र ही माझ्यासोबत जेवायला बसायला कारण आईने दूध वाडले की मी त्या दुधाला ढवळून त्यामध्ये चंद्र पाहण्यात एक वेगेळाच आनंद वाटत होता. 

गावामध्ये घराच्या पाठीमागे नऊखणाची ऐसपैस अशी गच्ची होती तिला लागून पाणी भरण्यासाठी आड होता. त्यावर एक रहाट बसवलेला होता. गच्चीवरून दीडदोनशे फूट अंतरावर 'मातंगवाड्यातले' उचं लिंबाचे झाड आडवंतिडवं पसरून उभे होते. गच्चीवरून  गुलाब मामुच्या अंगणातल्या पांढऱ्या चाफ्याची फुले सहजच काढला येतात. अशी घराची रचना होती, नदीच्या बाजूच्या उगवलेला चंद्र हळू हळू मांतंगवाड्यातल्या लिंबोणीच्या आड येत होता. त्याच वेळी रेडिओवर एक गाणे ऐकण्या साठी येते 'लिंबोणीच्या झाडा मागे. चंद्र झोपला ग बाई' पण असे दृश्य मला आजही कुठे दिसले नाही खंत निवेदकाला वाटते. 

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गावातील मंडळी घराच्या बाहेर म्हणजेच ओट्यावर, अंगणात, रानात, खळ्यात, उघड्यावर झोपायचे, रात्री उशिरापर्यत चंद्र व चांण्याचे निरीक्षण करतात.  त्या आभाळामध्ये पांढरे, काळे, ढग पाठशिवणीचा खेळ खेळताना दिसून येतात. रात्रीच्या वेळी मी खळ्यावर राखणीला, मळ्यात पिंकाना पाणी भरायला निघालो; की माझ्यासोबत चंद्रदेखील चालायला लागतो. पिकतल्या झुळझुळणाऱ्या पाण्यात उतरून माझ्या पायाशी घोटाळायचा, सर्व शिवार झोपले की मी आणि चंद्र सर्व शिवारात खेळतो, रात्र पळपळनं पुढे सरकते रात्र किती आली आहे. हे चांदण्यांनी भरलेल्या आभाळतल्या तीकांड, बाज इच्चू सुक यांच्याकडे पाहून मळेकरी अचूक वेळ सांगतात. याचे विलक्षण नवल वाटत होते. 

आकाशातील तुटला तारा पाहून आजूबाजूच्या मित्रांना आभाळाकडे पाहण्यासाठी सांगताना मित्रांना कळत नाही. ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात, आई धान्याच्या राशीवरून घोळ फिरवित होती. तेव्हा तुटता तारा म्हणून ओरडलो तर आई तोच घोळ उलटा करून माझ्या पाठीत मारून म्हणाली, 'मूडद्यातुटल तर तुटू देना. तारा तुडताना पाहणे अशुभ असते. पण माझ्या मनाला प्रश्न पडला की पृथ्वीवरचा कोणी माणूस मेला की तारा तुटतो. तुटणारा तारा पाहिला की आपल्या जीवनात अशुभ घटना घडते. हा प्रश्न अजूनही सुटला नाही. पृथ्वीवर पडलेल्या हा आकाशातून तुटलेला तारा आहे तरी कुठे आजवर कसा दिसला नाही ? त्याचा आणि माणसांच्या मरणाचा काय संबंध याचा प्रश्न पडला ?

एका कवीने आकाशातून तारा तुटताना पाहून त्या ताऱ्याकडे पाहून स्वत:साठी काहीतरी मागणे कसे घातले असेल: चांदण्यांनी भरलेल्या आभाळाच्या आठवणी जाग्या झाल्या. कवीला जी भिती वाटत होती, दोन तारे तुटून एक ना एक दिवस हे सुंदर आकाश मूंड-भुंड होऊन जाण्याची भिती वाटली नाही का ? हे सुंदर आकाश मूंड-भुंड झाले आहे. ही कवीची भीती खरी ठरली आहे. मी बालपणापासून, तरूनपणापासून आज साठ वर्षाचा झालो आहे, तरी आजही एखादा तारा तुटताना दिसतो. तीकांडे, बाज, इच्चु सुक आहे तिथेंच आहे. 

थोडक्यात 'चांदणभूल' या ललित लेखसंग्रहातून निवेदकाने निसर्गातील चंद्र, चांदण्या, शेतातील खळे, गावगाड्याचे दर्शन व त्याची निरीक्षणवृत्ती आणि मनाची संवेदनशीलता प्रामुख्याने सहज सोप्या भाषेतून चित्रित केली आहे. 

Previous Post Next Post