अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत

अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत

प्रश्न

 अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत ?

उत्तर

 

 

अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची असतात -

i) महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे, त्यांत कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे. महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे.

ii) कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे. ही कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे.

iii) जुन्या कागदपत्रांचे वाळवी, दमट हवा इत्यादींपासून संरक्षण करणे. 

iv) अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अमलात आणणे. संगणकीक प्रणालीचा वापर करणे.

v) विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करून महत्त्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे.

vi) राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे.

vii) अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे. 

Previous Post Next Post