ग्रंथालये आणि संग्रहालये राष्ट्रासाठी आवश्यक असतात, हे विधान स्पष्ट करा

ग्रंथालये आणि संग्रहालये राष्ट्रासाठी आवश्यक असतात, हे विधान स्पष्ट करा

प्रश्न

 ग्रंथालये आणि संग्रहालये राष्ट्रासाठी आवश्यक असतात, हे विधान स्पष्ट करा.

उत्तर

 

 

ग्रंथालये आणि संग्रहालये ही राष्ट्राचा चालताबोलता जिवंत इतिहरु असतो. त्यामुळे राष्ट्रासाठी त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते - 

i) ग्रंथालये व संग्रहालये यांच्यामुळे अभ्यासकाला इतिहासलेखन करणे सुलभ जाते. प्राचीन ऐतिहासिक साधनांचे जतन होते.

ii) ऐतिहासिक घटना व व्यक्तींची चरित्रे सामान्य लोकांपर्यंत पोहोचत भूतकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीची कल्पना येते. 

iii) वस्तुसंग्रहालये पाहिल्याने कला व अभिरुची यांत वाढ होते व इतिहासाबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनात बदल होतो. 

iv) प्राणी, कीटक, पक्षी, निसर्गघटक यांची माहिती होते.

v) ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसाराला हातभार लागतो. 

vi) मनोरंजन आणिपर्यटनाला चालना मिळते. तसेच व्यवसाय आणि रोजगार मिळण्यास मोठी संधी प्राप्त होते.

या विविध कारणांसाठी ग्रंथालये आणि संग्रहालये प्रत्येक राष्ट्रासाठी आवश्यक ● असतात. ही दोन्हीही राष्ट्राच्या प्रगतीची आणि वैभवाची प्रतीके असतात.

Previous Post Next Post