दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तींमध्ये वाढ झाली

दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तींमध्ये वाढ झाली


प्रश्न

दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तींमध्ये वाढ झाली.

उत्तर

 

 

i) दुसऱ्या महायुद्धानंतर मानवा मानवात भौगोलिक, धार्मिक, वांशिक भेद अधिक ताणले गेले. 

ii) नाझी अत्याचारामुळे लोकांत तेढ निर्माण झाली. दहशतवाद, अपहरण, सामाजिक संघर्ष इत्यादी फोफावला.

iii) आर्थिक संकटे आली. ती भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा गैरवापर केला गेला.

iv) दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी महासंहारक अणुबॉम्ब टाकले गेले. त्यामुळे जगभरात जनतेच्या आरोग्यावर परिणाम झाले.

v) सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, वांशिक आणि धार्मिक तेढ असे अनेक प्रश्न प्रमाणाबाहेर वाढले आणि या कारणांनी देशांत अशांततेचे वातावरण निर्माण झाले. 

vi) नंतरच्या काळात शेजारच्या देशांशी युद्धे होत राहिली. भौगोलिक सीमा बदलल्या आणि लोकांच्यात असुरक्षितता निर्माण झाली. मानवनिर्मित आपत्ती या सर्व कारणांमुळे वाढल्या.

 

Previous Post Next Post