घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात

घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात

प्रश्न

घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.

किंवा 

घड्याळजी घड्याळ दुरुस्त करण्यासाठी विशालक वापरतात.

उत्तर

 

 

i) साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या (बहिर्गोल भिंगाच्या) नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते.


ii) वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक (बहिर्गोल भिंग) वापरतात.


Previous Post Next Post