उकळते पाणी व वाफ यांचे तापमान सारखे असले तरी वाफेने झालेल्या जखमा उकळत्या पाण्याने झालेल्या जखमांपेक्षा अधिक तीव्र व वेदनादायक असतात

उकळते पाणी व वाफ यांचे तापमान सारखे असले तरी वाफेने झालेल्या जखमा उकळत्या पाण्याने झालेल्या जखमांपेक्षा अधिक तीव्र व वेदनादायक असतात

प्रश्न

उकळते पाणी व वाफ यांचे तापमान सारखे असले तरी वाफेने झालेल्या जखमा उकळत्या पाण्याने झालेल्या जखमांपेक्षा अधिक तीव्र व वेदनादायक असतात. 

उत्तर

 

 

i) 1 g उकळते पाणी व तेवढीच वाफ घेतली असता, वाफेमध्ये उकळत्या पाण्यापेक्षा 540 cal इतकी अधिक उष्णता अप्रकट उष्म्याच्या स्वरूपात असते.

ii) जेव्हा उकळते पाणी किंवा वाफ आपल्या शरीरावर पडते; त्या वेळी दर ग्रॅममागे 540 cal इतकी अधिक उष्णता वाफेचे संघनन होण्याच्या क्रियेमध्ये शरीराला दिली जाते. म्हणून उकळते पाणी व वाफ यांचे तापमान सारखे असले तरी उकळत्या पाण्यापेक्षा वाफेमध्ये असलेल्या या अधिक अप्रकट उष्म्यामुळे वाफेपासून होणाऱ्या जखमा अधिक तीव्र व वेदनादायक असतात.


Previous Post Next Post