ताऱ्यांची जीवनयात्रा स्वाध्याय

ताऱ्यांची जीवनयात्रा स्वाध्याय

ताऱ्यांची जीवनयात्रा स्वाध्याय

ताऱ्यांची जीवनयात्रा स्वाध्याय इयत्ता आठवी


प्रश्न. 1. शोधा म्हणजे सापडेल.

1) आपल्या दीर्घिकेचे नाव ................ हे आहे. 

उत्तर :

आपल्या दीर्घिकेचे नाव मंदाकिनी हे आहे. 


2) प्रचंड अंतरे मोजण्यासाठी ................. हे एकक वापरतात. 

उत्तर :

प्रचंड अंतरे मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरतात. 


3) प्रकाशाचा वेग ................. km/s एवढा आहे.

उत्तर :

प्रकाशाचा वेग 300,000 km/s एवढा आहे.


4) आपल्या आकाशगंगेत सुमारे .................... तारे आहेत.  

उत्तर :

आपल्या आकाशगंगेत सुमारे 1011 तारे आहेत.  


5) सूर्याची अंतिम अवस्था ....................... असेल.

उत्तर :

सूर्याची अंतिम अवस्था तांबडा राक्षसी तारा असेल.


6) ताऱ्यांचा जन्म .................. मेघांपासून होतो.

उत्तर :

ताऱ्यांचा जन्म आंतर तारकीय मेघांपासून होतो.


7) आकाशगंगा ही एक .................... दीर्घिका आहे. 

उत्तर :

आकाशगंगा ही एक सर्पिलाकार दीर्घिका आहे. 


8) तारे हे ................... वायूचे गोल आहेत.

उत्तर :

तारे हे तप्त वायूचे गोल आहेत.


9) ताऱ्यांचे वस्तुमान .................... वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते.

उत्तर :

ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते.


10) सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास .................... एवढा वेळ लागतो. तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास .................. एवढा वेळ लागतो.

उत्तर :

सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास 8 मि एवढा वेळ लागतो. तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास 1 सेकंद एवढा वेळ लागतो. 


11) ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची ................. जलद गतीने होते.

उत्तर :

ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची उत्क्रांती जलद गतीने होते.


12) ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या ................. अवलंबून असते.

उत्तर :

ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असते.


प्रश्न. 2. कोण खरे बोलतोय ?

1) प्रकाशवर्ष हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात. 

उत्तर :

खोटे


2) ताऱ्यांची अंतिम अवस्था त्याच्या मूळ वस्तुमानावर अवलंबून असते.

उत्तर :

खरे


3) ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील इलेक्ट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो.

उत्तर :

खरे


4) कृष्ण विवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो. 

उत्तर :

खोटे


5) सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराक्षसी अवस्थेतून जाईल.

उत्तर :

खरे


6) सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू ही असेल.

उत्तर :

खरे


प्रश्न. 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

1) ताऱ्यांची निर्मिती कशी होते ?

उत्तर : 

दीर्घिकांतील ताऱ्यांच्यामध्ये असलेल्या रिकाम्या जगांत ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ सापडतात. त्यांना आंतरतारकीय मेघ म्हणतात. त्यांचा विस्तार काही प्रकाशवर्षे इतका प्रचंड असतो.

एखाद्या विक्षोभामुळे हे आंतरतारकीय मेघ आकुंचित होऊ लागतात. त्यामुळे त्यांची घनता वाढत जाते व त्याचे तापमानही वाढत जाते. त्यांमधून तप्त वायूचा गोल तयार होतो. त्याच्या केंद्रातील तापमान व घनता पुरेशी वाढल्यावर तिथे अणू ऊर्जा निर्मिती सुरू होते. या ऊर्जेमुळे हा वायुचा गोल स्वयंप्रकाशित होतो. या स्वयंप्रकाशित गोळ्यास आपण तारा म्हणतो. अशा प्रकारे ताऱ्याची निर्मिती होते. 


2) ताऱ्यांची उत्क्रांती कशामुळे होते ?

उत्तर :

ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजे ताऱ्यावरच्या गुणधर्मातील बदल, त्यानुसार त्याचे वेगवेगळ्या अवस्थाता रूपांतर होण्याची प्रक्रिया असा बदल होण्यास हजारो वर्षाचा कालावधी लोटावा लागतो. उदाहरणार्थ सूर्याच्या गुणधर्मात गेल्या 4.5 अब्ज वर्षात बदल झालेला नाही. सूर्य अब्ज अजूनही स्थिर आहे. 

ताऱ्यांचे स्थैर्य कायम राखण्यासाठी

ताऱ्यांचे तापमान कायम राहणे आवश्यक असते. त्यासाठी ताऱ्यात साहाय्याने ऊर्जा निर्मिती होणे गरजेचे असते. पण तसे न झाल्यास अर्थात ऊर्जा निर्मिती कमी कमी होत गेल्यास ताऱ्याचे तापमान कमी कमी होत जाते. त्यामुळे वायुचा दाबही कमी होते. परिणामी गुरुत्वबल व वायुचा दाब यातील समतोल बिघडतो. गुरुत्वबल जास्त झाल्यामुळे तारा आकुंचन पावतो व ऊर्जा निर्मितीसाठी दुसरे इंधन वापरले जाते. अशी एकामागून एक इंधने वापरली जातात त्यामुळे तारा विभिन्न अवस्थातून जातो. यालाच ताऱ्यांची उत्क्रांती म्हणतात.


3) ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था कोणत्या ? 

उत्तर :

ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था -

श्वेत बटू, न्यूट्रॉन तारा, कृष्ण विवर या आहेत.


4) कृष्ण विवर हे नाव कशामुळे पडले ?

उत्तर :

सूर्यापेक्षा अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांचे महाराक्षसी ताऱ्यात रूपांतर होऊन महाविस्फोट होतो व त्यातून सतत आंकुचन पावण्याची प्रक्रिया सुरू होते. आकार लहान होत गेल्याने त्याची घनता व गुरुत्वबल खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडत नाही. प्रकाश किरण सुद्धा नाही. त्यामुळे त्याला कृष्ण विवर (Black hole) असे हे नाव पडले.


5) न्यूट्रॉन तारा ही कोणत्या प्रकारच्या ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. 

उत्तर :

ज्या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीपेक्षा जास्त व 25 पटीपेक्षा कमी असते त्या ताऱ्यांची अंतिम स्थिती म्हणजे न्यूट्रॉन तारा.


प्रश्न. 4. 1) तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दांत लिहा. 

उत्तर :

मी सूर्य असून मंदाकिनी आकाश गंगेत राहतो. मी एक तप्त वायुचा गोळा आहे. माझे तापमान 5800 K आहे. माझे केंद्रस्थानी तापमान यापेक्षा जास्त म्हणजे 1.5 x 10K आहे. माझे वस्तुमान 2 x 1010  kg व त्रिज्या 695700km असून वस्तुमान 2 × 1030  kg आहे. माझे वय 4.5 अब्ज वर्षे आहे. माझ्यात आजपर्यंत काहीही बदल झालेला नाही.

माझ्या केंद्रस्थानी सुरू असलेल्या अणूऊर्जा निर्मितीमुळे प्रचंड उष्णता निर्माण होते त्यामुळे माझे स्वतःचे तापमान कायम राखून संपूर्ण ग्रहमालिकेला मी ऊर्जा पुरवितो. माझ्यामुळे पृथ्वीवरील जीवन सृष्टी आहे.

माझ्या भोवताल फिरणारे नऊ ग्रह आहेत. माझ्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे, त्याचे अस्तित्व आहे.

एवढे असूनही काही अब्ज वर्षात माझा अंत ठरलेला आहे. माझी अंतिम अवस्था म्हणजे तांबडा राक्षसी तारा व श्वेत बटू.


2) श्वेत बटू बद्दल माहिती लिहा.

उत्तर :

ज्या ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या आठपटीपेक्षा कमी असते त्याची अंतिम अवस्था म्हणजे श्वेत बटू होय.

अशा ताऱ्यांच्या उत्क्रांतीच्या दरम्यान ताऱ्याचा आकार 100 ते 200 पटीने वाढते. या अवस्थेला तांबडा राक्षसी तारा म्हणतात. त्याचे तापमान कमी झाल्यामुळे तो लालसर दिसतो. आकार वाढत जाऊन शेवटी ताऱ्यांचा विस्फोट होतो. त्यामुळे त्याचे आवरण दूर फेकले जाते व आकार लहान होतो. त्याचा आकार पृथ्वी इतका लहान होऊ शकतो पण घनता खूप जास्त असते. अशा अवस्थेत हे तारे श्वेत दिसतात. त्यांना श्वेत बटू म्हणतात.

Previous Post Next Post