मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय

मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय

मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय

मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय इयत्ता आठवी


प्रश्न. 1. माझा जोडीदार शोधा. 

 'अ' गट 

'ब' गट 

1) ह्रदयाचे ठोके

2) RBC

3) WBC

4) रक्तदान

5) निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान

6) ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू 

अ) 350 मिली

आ) 7.4 

इ) 37°C

ई) 72 

उ) 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली

ऊ) 5000 ते 10,000 प्रति घ. मिली

उत्तर :

 'अ' गट 

'ब' गट 

1) ह्रदयाचे ठोके

2) RBC

3) WBC

4) रक्तदान

5) निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान

6) ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू 

ई) 72 

उ) 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली

ऊ) 5000 ते 10,000 प्रति घ. मिली

अ) 350 मिली 

इ) 37°C 

आ) 7.4  


प्रश्न. 2. खालील तक्ता पूर्ण करा. 

 इंद्रिय संस्था

इंद्रिये 

कार्ये 

 1) श्वसनसंस्था

 

 

 2) रक्तभिसरण संस्था

 

 

उत्तर :

 इंद्रिय संस्था

 इंद्रिये

 कार्ये 


1) श्वसनसंस्था

 नाक 

हवा आत गाळून घेणे.  

 घसा

हवा श्वासनलिकेपर्यंत पोहचवणे. 

 श्वासनलिका

हवा फुफ्फुसापर्यंत पोहचवणे.  

 फुफ्फुसे

हवेची देवाण घेवाण होते.  

 श्वासपटल 

श्वासोच्छ्वास घडवून आणतो.  

 2) रक्तभिसरण संस्था

 ह्रदय 

रक्त पंप करण्याचे वहन करणे.  

 रक्तवाहिन्या

शरीरात रक्ताचे वहन करणे.  

 केशवाहिन्या

शरीरातील सर्व पेशींना रक्तपुरवठा करणे.  


प्रश्न. 3. नामनिर्देशित सुबक आकृती काढा. 

1) श्वसनसंस्था

उत्तर :


2) ह्रदयची आंतररचना

उत्तर :


प्रश्न. 4. सकारण स्पष्ट करा.

1) मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते. 

उत्तर :

कारण i) मानवी रक्त लोहित रक्तपेशींनी बनलेले असते. 

ii) लोहित रक्तपेशीत हिमोग्लोबिन घटक असतो. हिमोग्लोबिन या घटकामुळे मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते.


2) श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते. 

उत्तर :

कारण i) बरगड्यावर जाणे आणि श्वासपटल खाली जाणे, या दोन्ही क्रिया एकाच वेळी घडून आल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो व बाहेरील हवा नाकाद्वारे फुफ्फुसांमध्ये जाते. 

ii) बरगड्या मूळ जागी परत आले व श्वासपटल वर गेला की फुफ्फुसावर दाब पडून त्यातील हवा नाकाद्वारे बाहेर ढकलली जाते. 

iii) त्यामुळे श्वाच्छोच्छ्वास घडून येतो व श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते. 


3) रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.

उत्तर :

कारण i) मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. 

ii) कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. 

iii) रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते. 

iv) थॅलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते. 

v) एका रक्तदानाने 1 ते 3 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.


4) 'O' रक्तगट असलेल्या व्यक्तीला 'सार्वत्रिक दाता' म्हणतात.

उत्तर :

कारण i) 'O' रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त इतर रक्तगट असलेल्या व्यक्तीस देता येते. 

ii) याकारणाने 'O' रक्तगट असलेल्या व्यक्तीला 'सार्वत्रिक दाता' म्हणतात.


5) आहारात मीठाचे प्रमाण कमी असावे. 

उत्तर :

कारण i) मीठामधील सोडिअम हे रक्तदाब आणि हृदयविकारांना कारणीभूत आहे. 

ii) याकारणाने आहारात मीठाचे प्रमाण कमी असावे.


प्रश्न. 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. 

1) रक्तभिसरण संस्थेचा श्वसन, पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा.

उत्तर :

i) रक्ताभिसरण संस्था व श्वसन संस्था दोन्हीच्या मदतीने शरीरात पेशीतील वायूची देवाण घेवाण होते. जर वायूची देवाण घेवाण झाली नाही तर सर्व पेशी मृत होतील. त्याचबरोबर श्वसनसंस्थेमुळेच शरीरात ऑक्सिजन प्रवेश करते ते रक्ताभिसरण संस्थेमार्फत शरीरभर पोहचवले जाते.

ii) पचनसंस्थेमार्फत विविध पोषकद्रव्य तयार केले जातात जे रक्ताभिसरण संस्थेमार्फत शरीरभर पोहचवले जाते. तसेच पचन न झालेले घातक पदार्थ सुद्धा रक्ताभिसरण संस्थेद्वारे वृक्कापर्यंत पोहचवले जाते.

iii) वृक्कापर्यंत आलेल्या रक्तातून युरीआ, युरीक आम्ल, पाणी रक्तातून वेगळे काढून पुन्हा संस्थेला पोहचवले जाते.

अशाप्रकारे रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन पचन व उत्सर्जन संस्थेशी संबंध येतो.


2) मानवी रक्ताची संरचना व कार्ये लिहा.

उत्तर :

मानवी रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते. 

मानवी रक्ताची कार्ये - i) उतींना प्राणवायू पुरवणे. 

ii) यकृताकडून ग्लुकोज, अमिनो आम्ले आणि मेदाम्ले या घटकांचा पुरवठा. यातील मेदाम्ले प्लाझमा प्रथिनाबरोबर वाहून नेली जातात. ग्लुकोज आणि अमोनिया आम्ले मात्र रक्तरसामध्ये विरघळलेली असतात. 

iii) कार्बन डायऑक्साइड, युरिया आणि लॅक्टिक आम्ल अशी अवशिष्टे काढून टाकते. 

iv) श्वेतपेशींच्या साहाय्याने शरीरातील आगंतुक घटकांचा शोध आणि त्याविरुद्ध प्रतिकार यंत्रणा उभी करते. प्रतिपिंड निर्मिती करते. 

v) रक्त कलयन - शरीरातील स्वयं दुरुस्ती यंत्रणा. शरीरातील रक्त वाहिन्यामधून बाहेर पडले म्हणजे रक्तकलयन यंत्रणा कार्यान्वित होते. प्लेटलेट्स रक्तातील थ्रॉबिनच्या तंतूमध्ये अडकून रक्त गोठते. उदा. जखमेमधून वाहणारे रक्त थांबते. 

vi) संप्रेरकाचे वहन-ही शरीराची उतींना संदेश पाठवण्याची प्रभावी यंत्रणा आहे. 

vii) रक्ताचे सामू नियंत्रण. 

viii) शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण. 

ix) द्रवीय कार्य इत्यादी. 


3) रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा.

उत्तर :

महत्त्व व गरज - i) मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. 

ii) कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. 

iii) रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारे रक्ताची गरज पूर्ण होते. 

iv) ॲलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते. 

v) कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही. 

vi) आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिटमधून रक्त व रक्तघटक वेगळे केले जातात. अशाच प्रकारे एका व्यक्तीच्या रक्तदानाने 1 ते 3 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. 


प्रश्न. 6. फरक स्पष्ट करा. 

1) धमन्या व शिरा

उत्तर :

 धमन्या 

शिरा

 i) ह्रदयापासून उतकाकडे ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस धमन्या/रोहिण्या म्हणतात. 

अपवाद - फुफ्फुस धमनी

ii) धमन्यांच्या भित्तिका जाड असून लवचिक असतात. 

iii) धमन्या शरीरात खोलवर स्थित असतात व त्यांना झडपा नसतात. 

iv) धमन्यांमध्ये रक्तदाब जास्त असतो. (100mm Hg) 

v) आकारांनुसार उतरता क्रम महाधमनी - धमन्या-धमनिका.

 i) उर्तीकडून कार्बन डायऑक्साईड युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करणाऱ्या रक्तवाहिणीस शिरा म्हणतात.

अपवाद - फुफ्फुस शिरा

ii) शिरांच्या भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात. 

iii) शिरा त्वचेखाली स्थिर असतात व त्यांना झडपा असतात. 

iv) शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो. 

(2 mm Hg)

v) आकारानुसार उतरता क्रम महाशिरा - शिरा - शिरिका.


2) बर्हिःश्वसन व अंत: श्वसन

उत्तर :

 बर्हिश्वसन

अंत:श्वसन

 i) बर्हिश्वसन ही भौतिक प्रक्रिया आहे.

ii) ऑक्सिजनयुक्त हवा फुफ्फुसात प्रवेश करणे तसेच कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा फुफ्फुसाबाहेर टाकली जाणे या क्रियेला बर्हिः श्वसन म्हणतात. 

iii) बर्हिः श्वसनाची क्रिया श्वास आणि उच्छ्वास या दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.

iv) या क्रियेत रक्तातील ऑक्सिजन उतींमध्ये सोडल्या जातो. 

v) रक्तातील ऑक्सिजनचा दाब 100mmHg पासून 40 mm Hg पर्यंत कमी होतो. 

 i) अंतःश्वसन ही जैव रासायनिक प्रक्रिया आहे.

ii) ज्या प्रक्रियेमध्ये पेशीत ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते त्यास पेशीश्वसन किंवा अंतःश्वसन म्हणतात.

iii) अंत: श्वसनाची क्रिया विविध सजीवांमध्ये वेगवेगळी असते परंतु पहिली पायरी सर्व सजीवात समान असते.

iv) या क्रियेत वायुकोशिकेतील ऑक्सिजन रक्तामध्ये सोडल्या जातो. (2mm Hg)

v) रक्तातील ऑक्सिजनचा दाब 40mm Hg पासून 100mm Hg पर्यंत वाढतो. 


प्रश्न. 7. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल ?

उत्तर :

रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे पुढील निकष लक्षात घेतात.

• रक्तदान करणारा व्यक्ती 18 वर्षांवरील असावा.

• वजन 45 कि.ग्र वर असावे.

• रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमीत कमी 12.5 ग्रॅम असावे.

• मागील 3 दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले नसावे..

• मागील 3 महिन्यात मलेरिया झाला नसावा.

• मागील 1 वर्षात विषमज्वर, काविळ किंवा श्वानदंश होऊन रेबीजची लस घेतली नसावी.

• 6 महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली नसावी.

• गर्भवती महिला, महिलेला 1 वर्षांखालील मूल नसल्यास किंवा तिचा 6 महिन्यात गर्भपात झाला नसावा.


प्रश्न. 8. कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा.

(हिमोग्लोबीन, आम्लारीधर्मी, श्वासपटल, अस्थिमज्जा, ऐच्छिक, अनैच्छिक, आम्लधर्मी)

1) रक्तातील तांबड्या पेशीमध्ये ..................... हे लोहाचे संयुग असते. 

उत्तर :

रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबीन हे लोहाचे संयुग असते. 


2) ..................... हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते. 

उत्तर :

श्वासपटल हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते. 


3) हृदय स्नायू ................. असतात.

उत्तर :

हृदय स्नायू अनैच्छिक असतात.


4) ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH ................ असते.

उत्तर :

ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH आम्लारीधर्मी असते.


5) RBC ची निर्मिती .................. मध्ये होते. 

उत्तर :

RBC ची निर्मिती अस्थिमज्जा मध्ये होते. 


प्रश्न. 9. आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.

1) A, O, K, AB, B

उत्तर :

K इतर सर्व रक्तगट आहेत.


2) रक्तद्रव्य, रक्तपट्टीका, रक्तपराधान, रक्तकणिका 

उत्तर :

रक्तपराधान इतर सर्व रक्ताचे घटक आहेत.


3) श्वासनलिका, वायुकोश, श्वासपटल, केशिका

उत्तर :

केशिका इतर सर्व श्वसन संस्थेतील आवश्यक अवयव आहेत. 


4) न्युटोफिल, ग्लोब्युलिन्स, अँल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बीन

उत्तर :
प्रोथ्रोम्बीन इतर सर्व रक्तद्रव्याचे घटक आहेत. 


प्रश्न 10- खालील उतारा वाचा व रोग/विकार ओळखा.

आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले, पण ते निरोगी, हसरे नाही. ते सारखे किरकिर करते, दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे. त्याला धाप लागते. त्याचा श्वास फार जलद आहे. त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत.

उत्तर :

अस्थमा. 


प्रश्न. 11. तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे ? 

उत्तर :

रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी काकांनी पुढील मदतदायी उपाय करावेत :

• पोटॅशिअमची अधिक मात्रा असलेले अन्न सेवन करावे.

• मद्यसेवन टाळावे.

• नियमित व्यायाम करावा.

• अतिरिक्त प्रमाणात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम संपुरके घ्यावी.

• तंतुमय पदार्थ अधिक असलेला शाकाहारी आहार घ्यावा.

• ताण-तणाव घालवण्यासाठी उपचार करावा.

• धूम्रपान टाळावे.

• कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे.

• मधुमेहावर नियंत्रण ठेवावे.

• रक्तदाब वाढवणारी औषधे टाळावी. 

• वजन कमी करणे. 

• आहारात मीठाचे प्रमाण कमी करणे. 

Previous Post Next Post