स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती स्वाध्याय

स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती स्वाध्याय

स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती स्वाध्याय

स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती स्वाध्याय इयत्ता आठवी


1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर ................... होती. 

अ) राज्ये 

ब) खेडी

क) संस्थाने 

ड) शहरे

उत्तर :

भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर संस्थाने होती. 


2) जुनागढ ................. व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. 

अ) औंध 

ब) झाशी 

क) वडोदरा

ड) हैद्राबाद 

उत्तर :

जुनागढ हैद्राबाद व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. 


2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) जुनागढ भारतात विलीन झाले. 

उत्तर :

जुनागढ हे सौराराष्ट्रातील एक संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. जुनागढच्या नवाबाला मात्र पाकिस्तानात सामील व्हायचे होते. त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानला निघून गेला. त्यानंतर फेब्रुवारी 1948 मध्ये संस्थान भारतात विलीन झाले. 


2) भारत सरकारने निजमाविरुद्ध पोलिस कारवाई सुरू केली. 

उत्तर :

1947 च्या जुलैमध्ये हैद्राबाद स्टेट कॉग्रेसने हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला. मात्र निजामाने भारतविरोधी धोरण स्वीकारले. तो हैद्राबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लागला. निजामाचा सहकारी कासीम रझवी याने लोकांची चळवळ दडपण्यासाठी रझाकार नावाची संघटना स्थापन केली. 

या संघटनेचे हिंदूंवरच नाही तर लोकशाहीवादी मुस्लिमांवरसुद्धा अत्याचार केले. अशात भारत सरकार निजामाशी सामोपचाराने बोलणे करण्याचा प्रयत्न करत होते; परंतु निजाम साथ देत नव्हाता. अखेरीला भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामांविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. याला 'ऑपरेशन पोलो' हे सांकेतिक नाव होते. शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला व हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले. 


3) भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली. 

उत्तर :

काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते. मात्र काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता. यासाठी पाकिस्तान हरिसिंगवर दबाव आणू लागला. 1947 च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. तेव्हा भारतावर सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली. 


3. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) संस्थानांच्या विलीनीकरण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा. 

उत्तर :

भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला. त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वाना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला. 

भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे, हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिले. त्यांच्या या अहवालाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जुनागढ, हैद्राबाद, काश्मीर यांचा अपवाद वगळता. सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी कणखर भूमिका घेऊन सोडविला. 


2) हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा. 

उत्तर :

1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैद्राबाद स्टेट कॉग्रेसची स्थापना केली. निजामाने या संघटनेवर बंदी घातली. या संघटनेला मान्यता मिळविण्यासाठी व लोकशाही हक्कासाठी लढा सुरू झाला. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केले. त्यांना नारायण रेड्डी, सिराझ-उल् हसन तिरमीजी यांचे सहकार्य लाभले. पी.व्ही. नरसिंहराव व गोविंदभाई श्राॅफ हे स्वामीजींचे निष्ठावंत अनुयानी होते.  

Previous Post Next Post