पेशी व पेशीअंगके स्वाध्याय

पेशी व पेशीअंगके स्वाध्याय

पेशी व पेशीअंगके स्वाध्याय

पेशी व पेशीअंगके स्वाध्याय इयत्ता आठवी


प्रश्न. 1. मला ओळखा.

1) ATP तयार करण्याचा कारखाना आहे. 

उत्तर :

तंतुकणिका.


2) एकपदरी आहे, पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो. 

उत्तर :

रिक्तिका.


3) पेशीला आधार देतो पण मी पेशीभित्तिका नाही. माझे शरीर तर जाळीसारखे आहे.

उत्तर :

आंतर्द्रव्यजालिका


4) पेशींचा जणू रसायन कारखाना

उत्तर :

तंतुकणिका.


5) माझ्यामुळे तर आहेत पाने हिरवी

उत्तर :

हरितलवक.


प्रश्न. 2. तर काय झाले असते ?

1) लोहितरक्तकणिकेत तंतुकणिका असत्या. 

उत्तर :

i) लोहितरक्तकणिकेत तंतुकणिका असत्या तर लोहितपेशीद्वारे वाहून नेला जाणारा ऑक्सिजन हा इतर पेशींना मिळाला नसता तर, तंतुकणिकेद्वारा तो वापरल्या गेला असता. 

ii) यामुळे इतर पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसता व पेशीश्वसन घडून आले नसते. 


2) तंतुकणिका व लवके यांमध्ये फरक नसता.

उत्तर :

i) तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऊर्जा निर्माण करून साठवते तर लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. 

ii) यामुळे जर तंतुकणिका व लवके यात फरक नसता तर दोन्हीपैकी एकाच प्रकारे ऊर्जा निर्मिती झाली असती. 

iii) तसेच प्राण्यांमध्ये सर्व प्राणी हे लवकामुळे वेगवेगळ्या रंगाची दिसू लागले असते. 


3) गुणसूत्रावर जनुके नसती.

उत्तर :

i) गुणसूत्रांवरील जनुकांद्वारे सजीवांमधील जनुकीय घटक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेली जातात. 

ii) गुणसूत्रावर जनुके नसती तर एका पिढीची लक्षणे दुसऱ्या पिढीमध्ये दिसून आली नसती. 


4) पारपटल निवडक्षम नसते.

उत्तर :

i) पारपटल काही ठराविक आवश्यक पदार्थांना ये-जा करू देते व काही ठराविक अशा पदार्थांना आत प्रवेश करू देत नाही. 

ii) पारपटल निवडक्षम नसते तर पाणी, क्षार व ऑक्सिजन यांसारख्या उपयुक्त पदार्थांबरोबर कॉर्बनडाय ऑक्साइडसारखे पदार्थ पेशीतच राहिले असते. 


5) वनस्पतीत अँन्थोसायनिन नसते.

उत्तर :

i) अँन्थोसायनिन हे एक वर्णलवक आहे. ज्यामुळे वनस्पतीच्या ठराविक भागांचा रंग जांभळा किंवा निळा दिसतो. 

ii) वनस्पतीत अँन्थोसायनिन। नसते तर आपल्याला कृष्णकमळ, जांभूळ, ब्लू बेरी, लिलि यांसारखे रंगीत वनस्पती दिसल्या नसत्या.


प्रश्न. 3. आमच्यामध्ये वेगळा कोण ? कारण दया. 

1) केंद्रकी, तंतुकणिका, लवके, आंतर्द्रव्यजालिका.

उत्तर :

लवके - इतर सर्व पेशीअंगके प्राणी पेशींमध्ये आढळतात. 


2) डी.एम.ए. रायबोझोम्स, हरितलवके.

उत्तर :

डी. एन. ए. - इतर सर्व पेशीअंगके वनस्पती पेशींमध्ये आढळतात. 


प्रश्न. 4. कार्ये लिहा.

1) पेशीपटल 

उत्तर :

i) पेशीपटल निवडक्षम पारपटल असून काही ठराविक पदार्थांना पेशीत आत-बाहेर करू देते व काहींना अटकाव करते. 

ii) पेशीपटलामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन हे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश देते. 

iii) कार्बन डाय ऑक्साइडसारखे टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकले जाते. 

iv) पेशीतील पर्यावरण कायम राखते.


2) पेशीद्रव्य

उत्तर :

पेशीमधील अमिनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्त्वे इ. महत्त्वाचे पदार्थ साठविण्याचे ठिकाण. 


3) लयकारिका

उत्तर :

i) रोगप्रतिकार यंत्रणा - पेशीवर हल्ला करणाऱ्या जिवाणू व विषाणूंना नष्ट करते. 

ii) उद्धवस्त करणारे पथक - जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. 

iii) आत्मघाती पिशव्या - पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. 

iv) उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन करते. 


4) रिक्तिका

उत्तर :

i) पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे. 

ii) चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते (ग्लायकोजेन, प्रथिने, पाणी) साठवणे. 

iii) प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते. 

iv) वनस्पतीपेशीतील रिक्तिका पेशीद्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात.


5) केंद्रक

उत्तर :

i) पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशीविभाजन यांवर नियंत्रण ठेवणे. 

ii) जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे.


प्रश्न. 5. माझा रंग कोणामुळे ?

1) लाल टोमॅटो

2) हिरवे पान

3) गाजर

4) जांभूळ

अ) क्लोरोफिल 

आ) कॅरोटीन 

इ) अँन्थोसायनिन 

ई) लायकोपीन

उत्तर :

1) लाल टोमॅटो

2) हिरवे पान

3) गाजर

4) जांभूळ

ई) लायकोपीन

अ) क्लोरोफिल  

आ) कॅरोटीन 

इ) अँन्थोसायनिन

Previous Post Next Post