महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय

महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय

महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय

महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय इयत्ता आठवी 


1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) 1 मे 1960 रोजी ................... राज्याची निर्मिती झाली. 

अ) गोवा 

ब) कर्नाटक 

क) आंध्रप्रदेश 

ड) महाराष्ट्र

उत्तर :

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 


2) मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव ................ यांनी मांडला. 

अ) ग. त्र्यं. माडखोलकर 

ब) आचार्य अत्रे 

क) द. वा. पोतदार 

ड) शंकरराव देव

उत्तर :

मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आचार्य अत्रे यांनी मांडला. 


3) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ................. यांनी जबाबदारी स्वीकारली. 

अ) यशवंतराव चव्हाण 

ब) शंकरराव चव्हाण 

क) पृथ्वीराज चव्हाण 

ड) विलासराव देशमुख

उत्तर :

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. 


2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. 

उत्तर :

मराठी भाषक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. राज्यभर असंतोष धुमसत होता. 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार समितीच्या अध्यक्षपदी श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्षपदी डॉ. त्र्यं. रा. नरवणे, तर सचिवपदी एस. एम. जोशी यांची निवड झाली. या समितीची स्थापना करण्यात ग. त्र्यं. माडखोलकर आचार्य प्र. के. अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार ठाकरे, य. कृ. सोवनी. सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एकसंघता येण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. 


2) संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. 

उत्तर :

या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपणनावाने व्यंगचित्र काढून जनआंदोलन व्यापक बनवले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द. ना. गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. 


3. टिपा लिहा. 

1) संयुक्त महाराष्ट्र परिषद 

उत्तर :

21 जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशाचा एक प्रांत करावा. यात मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक, तसेच मराठवाडा, गोमंतक या मराठी भाषिक प्रांताचा समावेश करावा, असा ठराव संमत केला. 


2) संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान 

उत्तर :

मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. राज्यभर असंतोष धुमसत होता. 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. या समितीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत फार मोठे योगदान दिले. आंदोलन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले. मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर प्रचंड आंदोलन उभे राहिले. या चळवळीत राज्य शासनाने केलेल्या आंदोलनात 106 जण ठार झाले. 

1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर 1957 ला लोकसभा निवडणुकीत संयुक्त समितीला मोठे यश मिळाले. 

30 नोव्हेंबर 1957 रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते होणार होते. त्या वेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. पोलादपूरजवळ पसरणी घाटात निदर्शने केली. मराठी भाषिकांच्या भावनांची व एकूण परिस्थितीची जाणीव पंडित नेहरूंना करून देण्यात समिती यशस्वी झाली. परिणामी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. 


4. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

 

उत्तर :


Previous Post Next Post