सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय इयत्ता आठवी


1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

(पं. श्यामजी कृष्ण वर्मा, मित्रमेळा, रामसिंह कुका)

1) स्वा. सावरकर यांनी .............. ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापना केली. 

उत्तर :

स्वा. सावरकर यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापना केली. 


2) पंजाबमध्ये ................ यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले. 

उत्तर :

पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले. 


3) इंडिया हाऊसची स्थापना .................... यांनी केली. 

उत्तर :

इंडिया हाऊसची स्थापना पं. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. 


2. पुढील तक्ता पूर्ण करा. 

 क्रांतिकारक 

संघटना 

 ....................

 अभिनव भारत 

 बारींद्रकुमार घोष

..................... 

 चंद्रशेखर आझाद

 ....................


उत्तर :

 क्रांतिकारक 

संघटना 

विनायक दामोदर सावरकर 

 अभिनव भारत 

 बारींद्रकुमार घोष

अभिनव समिती

 चंद्रशेखर आझाद

हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन


3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. 

उत्तर :

सन १८९७ साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम-जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७ रोजी  रँडचा वध केला. 


2) खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली. 

उत्तर :

१९०८ साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्जफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉब टाकला ती गाडी किंग्जफोर्डची नव्हती. या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. या कारणामुळे खुदीराम बोस यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. 


3) भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉब फेकले. 

उत्तर :

नागरी हक्कांची पायमल्ली करणारी दोन विधेयके या वेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती. त्यांना निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बाब फेकले. 


4. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तान्त लिहा. 

उत्तर :

सूर्य सेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्याभोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रितीलता वड्डेदार अशांसारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली. त्यांच्या साहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्य सेन यांनी आखली. योजनेप्रमाणे १८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील दोन शस्त्रागारांतील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलीफोन व टेलीग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढत दिली. 


2) स्वा. सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा. 

उत्तर :

सन १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे 'मित्रमेळा' ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. १९०४ साली याच संघटनेला 'अभिनव भारत' असे नाव देण्यात आले. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना वाड्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकांचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. १८५७ चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्ययुद्ध होते. असे प्रतिपादन करणारा '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ त्यांनी लिहिला.  

Previous Post Next Post