पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय

पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय

पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय

पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय इयत्ता नववी

पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय इयत्ता नववी स्वाध्याय


1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 

अ. धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिकजलाच्या रेणूंची संख्या ................... आहे. 

उत्तर :

धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिकजलाच्या रेणूंची संख्या 10 आहे. 


आ. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव ................. आहे. 

उत्तर :

बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडिअम बायकार्बोनेट आहे. 


इ. हायपर थायराॅइडिझम या रोगाच्या उपचारासाठी .................... चा वापर करतात. 

उत्तर :

हायपर थायराॅइडिझम या रोगाच्या उपचारासाठी आयोडिन चा वापर करतात. 


ई. टेफ्लाॅनचे रासायनिक नाव ................... आहे. 

उत्तर :

टेफ्लाॅनचे रासायनिक नाव पॉलीटेट्रॅाफ्ल्युरोइथिलीन आहे. 


2. जोड्या जुळवा. 

 'अ' गट 

 'ब' गट

1) संतृप्त मिठवणी

2) सम्मिलित मीठ

3) CaOCl2

4) NaHCO3

अ) सोडिअम धातू मुक्त

ब) आम्लारिधर्मी क्षार

क) मिठाचे स्फटिकीभवन

ड) रंगाचे ऑक्सिडीकरण

उत्तर :

 'अ' गट 

 'ब' गट

1) संतृप्त मिठवणी

2) सम्मिलित मीठ

3) CaOCl2

4) NaHCO3

क) मिठाचे स्फटिकीभवन

अ) सोडिअम धातू मुक्त

ड) रंगाचे ऑक्सिडीकरण

ब) आम्लारिधर्मी क्षार



3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. किरणोत्सारिता म्हणजे काय ?

उत्तर :

युरेनियम, थोरियम, रेडिअम यांसारख्या उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो त्याला किरणोत्सारिता म्हणतात.


आ. अणूकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात ?

उत्तर :

जेव्हा अणुकेंद्रकातून किरणोत्सार होतो. तेव्हा अणुकेंद्रक अस्थिर आहे असे म्हणतात.


इ. कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात ?

उत्तर :

i) कृत्रिम खाद्य रंग वापरलेल्या पदार्थाच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) सारखे आजार उद्भवू शकतात. 

ii) ॲलर्जी होते, कर्करोग होऊ शकतो.


ई. औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कोठे करतात ?

उत्तर :

औदयोगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग पुढील ठिकाणी करतात.

i) रेडिओग्राफी 

ii) जाडी, घनता, पातळी यांचे मापन करणे 

iii) X-Ray unit मध्ये 

iv) दीप्तिमान रंग व किरणोत्सारदिप्ति रंग 

iv) सिरॅमिकपासून बनविण्यात येणाऱ्या टाईल्स, भांडी, प्लेटस्, स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात. त्यासाठी किरणोत्सारीतेचा उपयोग होतो. 


उ. टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा. 

उत्तर :

टेफ्लॉनचे गुणधर्म पुढील प्रमाणे आहेत. 

i) वातावरणाचा व रासायनिक या पदार्थाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही. 

ii) पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन लो कोटेड वस्तूंना चिकटत नाहीत. 

iii) उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत या नाही कारण टेफ्लॉनचा द्रवणांक 327°C आहे. 

iv) टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात. 


ऊ. पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल ? का ? 

उत्तर :

पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी बीट, पळसाची फुले, पालक, गुलमोहोर, फळांचे अर्क या निसर्गातील विविधरंगी स्रोतांपासून तयार केलेले रंग वापरू. कारण - या नैसर्गिक रंगामुळे कोणत्याही प्रकारचे अपायकारक रोग होत नाही. 


4. स्पष्टीकरणासह लिहा. 

अ. विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो. 

उत्तर :

i) विरंजक चूर्णातील प्रमुख घटक क्लोरीन असतो. 

ii) या विरंजक चुर्णाचे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडमुळे विघटन होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो. त्यामुळे विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो.


आ. विहिरीचे दुष्फेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते. 

उत्तर :

कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या क्लोराइडस व सल्फेट्सच्या अस्तित्वामुळे पाणी दुष्फेन होते. असे पाणी सुफेन व वापरण्यायोग्य बनवण्यासाठी Na2 CO3 (धुण्याचा सोडा) वापरतात. सोड्याबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशिअम व कॅल्शिअमचे अविद्राव्य कार्बोनेट क्षार तयार होतात. म्हणून विहिरीचे दुष्पेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते.


इ. दुष्फेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो. 

उत्तर :

साबण दुष्फेन पाण्यात मिसळल्यास साबणातील सोडीअमचे विस्थापन होऊन तेलाम्लांचे कॅल्शिअम व मॅग्नेशिअम क्षार तयार होतात. हे क्षार पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे त्यांचा साका तयार होतो.


ई. पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात. 

उत्तर :

i) पावडर कोटिंग पद्धतीत पॉलिमर रेझिन रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवतात. 

ii) इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रे डिपॉझिशन करताना धातूच्या घासलेल्या भागावर ह्या पावडरचा फवारा उडवतात. 

iii) ह्या पद्धतीत पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो. त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिकटून बसतो.


उ. ॲनोडायझींगमध्ये ॲल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. 

उत्तर :

i) विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून ॲनोडायझींग केले जाते. 

ii) विद्युत अपघटनी घटात विरल आम्ल घेऊन त्यामध्ये ॲल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवतात. 

जन वायू तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो. 

(iii) विद्युतप्रवाह सुरू केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो. 

iv) ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन ॲल्युमिनिअम वस्तूरूपी धनाग्रावर हायड्रेटेड ॲल्युमिनिअम ऑक्साइडचा थर तयार होतो. म्हणून ॲनोडायझींगमध्ये अल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. 


ऊ. काही किरणोत्सारी पदार्थांतून येणारे प्रारण विदयुत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी खुणा दिसून येतात. 

उत्तर :

i) रूदरफोर्ड आणि विलार्ड यांनी विविध किरणोत्सारी पदार्थांतून, उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांचा अभ्यास करण्यासाठी प्रारणे विदयुत क्षेत्रातून जाऊ दिली व त्यांच्या मार्गात फोटोग्राफिक पट्टी धरली तेव्हा त्यांना प्रारणांचे तीन प्रकारे विभाजन झाल्याचे आढळले. 

ii) एक प्रारण ऋण प्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झाल्याचे आढळले तर दुसरे प्रारण धन प्रभारित पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झाल्याचे दिसले. परंतु तिसऱ्या प्रारणांचे विद्युत क्षेत्रात अजिबात विचलन झाले नाही. 

iii) ऋणप्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झालेल्या किरणांना अल्फा किरणे, धनप्रभारित किरणांना बिटा किरणे आणि अजिबात विचलित न झालेल्या किरणांना गॅमा किरणे म्हणतात.


ए. स्प्रेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात. 

उत्तर :

i) सिरॅमिक हे ठिसूळ, विदयुतरोधक व जलरोधक आहेत. 

ii) तसेच सिरॅमिक हे उच्च तापमानाला विघटन न होता राहू शकतात. 

iii) स्पेस शटल हे अतिशय वेगाने जात असतांना प्रचंड प्रमाणात उष्णता उत्सर्जित करते. त्यामुळे सिरॅमिक टाईल्स त्या तापमानाला अवरोध करत स्पेस शटलला कोणतीही हानी होऊ देत नाही. त्यामुळे स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात.


5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. कृत्रिम खाद्यरंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा. 

उत्तर :

i) कृत्रिम खाद्यरंग अनैसर्गिकरित्या तयार केले जातात. 

ii) पिवळा रंग (ट्रेझीन व सनसेट येलो) निळा रंग (इंडिगो कारमीन व ब्रिलीरांट ब्लू FCE), हिरवा रंग (डार्क ग्रीन FCF) कृत्रिमरंग मोठ्या प्रमाणात वापल्या जातात. 

iii) लोणचे, जॅम आणि सॉस यामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये शिसे, पारा वापरला जातो. सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ती घातक ठरतात. 

iv) खाद्य रंग वापरलेल्या पदार्थाच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) सारखे आजार उद्भवतात. तसेच पोट दुखणे, अन्नविषबाधा असे आजार उद्भवतात.  


आ. स्फटिकजल म्हणजे काय ते सांगून स्फटिकजल असणारे क्षार व त्यांचे उपयोग लिहा. 

उत्तर :

स्फटिक तयार होताना जर आर्द्र द्रावणातून तयार केले जात असतील तर ते क्षार स्वतः बरोबर काही पाण्याची रेणूसुद्धा सामावून घेतात आणि मगच त्याचे स्फटिक तयार होतात. अशा द्रावणाला स्फटिकजल असे म्हणतात. स्फटिकजल असणारे क्षार व त्यांचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

i) तुरटी   -    जलशुद्धीकरण

ii) बोरॅक्स   -   अपमार्जक

iii) ईप्सम सॉल्ट  -  औषधांमध्ये

iv) बेरीअम क्लोराइड  -  शुद्धीकरणासाठी

v) सोडीअम सल्फेट  -  अपमार्जके तयार करण्याकरिता


इ. सोडीअम क्लोराइडचे विद्युत अपघटन करण्याच्या तीन पद्धती कोणत्या ?

उत्तर :

i) सोडीअम क्लोराइडच्या संतृप्त जलीय द्रावणातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास त्याचे अपघटन होते व ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तर धनाग्राजवळ क्लोरीन वायू मुक्त होतो. क्लोरीन वायूच्या निर्मितीसाठी ही पद्धत उपयोगात आणतात. 

2NaCl + 2H2 2NaOH + Cl2  + H2 

ii) उच्च तापमानास मीठ तापविले असता ते वितळते यास मिठाची सम्मिलित अवस्था म्हणतात. 

iii) सम्मिलित मिठाचे विद्युत अपघटन केले असता. धनाग्राजवळ क्लोरीन वायू तर धनाग्राजवळ द्रवरूप सोडिअम धातू मुक्त होतो.   


6. उपयोग लिहा. 

अ. अँनोडायझींग 

उत्तर :

i) तवे, कुकर अशा स्वयंपाकाच्या भांड्यांवर ॲनोडायझींग थर देण्यासाठी होतो, 

ii) ॲनोडायझींग केलेली भांडी अधिक टिकाऊ असते, या भांड्यातील अन्न लवकर शिजते.


आ. पावडर कोटिंग

उत्तर :

i) लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून पावडर कोटिंग केले जाते. 

ii) धातू कोटिंग करण्याकरिता, गाड्यांचे पार्टस तसेच सायकलचे विविध पार्टस कोटिंग करण्यासाठी तसेच घरातील विविध उपकरणे यांना कोटिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो.


इ. किरणोत्सारी पदार्थ

उत्तर :

i) औदयोगिक क्षेत्रात धातूकामातील दोष शोधण्यासाठी रेडिओग्राफी तंत्र वापरतात. त्यासाठी किरणोत्सारी पदार्थांचा उपयोग होतो. 

ii) जाडी, घनता, पातळी यांचे मापन करण्यासाठी, 

iii) घड्याळाचे काटे, विशिष्ट वस्तू अंधारात दिसण्यासाठी रेडिअम, प्रोमेथिअस, ट्रीटिअम पदार्थाचा वापर करतात. 

iv) सिरॅमिक वस्तूंमध्ये किरणोत्सारी पदार्थांचा वापर करतात. 

v) कृषी क्षेत्रात रोपांची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी 

vi) अन्नपरिरक्षणात 

vii) विविध पिकांवरील संशोधनात 

viii) वैदयकशास्त्रात हाडांचा कर्करोग, हायपर थॉयरॉइडिझम तसेच ट्यूमर ओळखणे यांमध्ये केला जातो.


ई. सिरॅमिक

उत्तर :

i) विद्युत उपकरणांमध्ये 

ii) भट्टीच्या आतील भागास लेप देण्यासाठी 

iii) जहाज तसेच जेट इंजिनच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी सिरॅमिकचा उपयोग करतात. तसेच स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाइल्सचा उपयोग होतो.


7. दुष्परिणाम लिहा. 

अ. कृत्रिम डाय

उत्तर :

i) केसांना रंग लावल्याने केस गळणे, केसांचा पोत खराब होणे, त्वचेची आग होणे, डोळ्यांना इजा पोहोचणे इत्यादी धोके संभवतात. 

ii) लिपस्टिकमध्ये कॅरमाइन नावाचा रंग असतो. याने ओठांना इजा होत नाही परंतु ते पोटात गेल्यावर पोटाचे विकार होतात.


आ. कृत्रिम खाद्यरंग

उत्तर :

i) खाद्यरंग वापरलेल्या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलांमध्ये ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) उद्भवतात. 

ii) पोटाचे विकार, ॲलर्जी, कर्करोग, मज्जासंस्थेचे रोग होवू शकतात.


इ. किरणोत्सारी पदार्थ

उत्तर :

i) चेतासंस्थेला इजा पोहोचते. 

ii) आनुवंशिक दोष निर्माण होतात.

iii) त्वचेचा कर्करोग, ल्यूकेमिआ यांसारखे रोग होतात. 

iv) समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषणे माशांच्या शरीरात जाऊन त्यांच्यामार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात. 

v) घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. 

vi) वनस्पती, फळे, फुले, धान्य, गाईचे दूध इत्यादींमधून स्ट्रॉन्शिअम - 90 हे किरणोत्सारी समस्थानिक शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर, ल्युकेनिआ असे रोग होण्याची शक्यता असते.


ई. दुर्गंधीनाशक

उत्तर :

i) ॲल्युमिनिअम - झिरकोनियम ही संयुगे डिओडरंटमधील सर्वांत घातक असणारी रसायने आहेत. त्यामुळे नकळतपणे डोकेदुखी, अस्थमा, श्वसनाचे विकार, ह्दयविकार असे आजार संभवतात. 

ii) ॲल्युमिनिअम क्लोराहायड्रेटसमुळे त्वचेचे विविध विकार तसेच त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. 


8. रासायनिक सूत्र लिहा. 

विरंजक चूर्ण, मीठ, बेकिंग सोडा, धुण्याचा सोडा. 

i) विरंजक चूर्ण - CaOCl2

ii) मीठ - NaCl

iii) बेकिंग सोडा - NaHCO3

iv) धुण्याचा सोडा - Na2CO3. 10H2O

Previous Post Next Post