भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय इयत्ता नववी

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र


1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) भारताचे ................. हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात. 

अ) प्रधानमंत्री

ब) राष्ट्रपती

क) संरक्षण मंत्री

ड) राज्यपाल

उत्तर :

भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात. 


2) भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल -

अ) भूदल

ब) तटरक्षक दल

क) सीमा सुरक्षा दल 

ड) जलद कृतिदल

उत्तर :

भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल - तटरक्षक दल


3) विद्यार्थामध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ................. ची स्थापना करण्यात आली. 

अ) बी. एस. एफ. 

ब) सी. आर. पी. एफ. 

क) एन. सी. सी. 

ड) आर. ए. एफ. 

उत्तर :

विद्यार्थामध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी एन. सी. सी. ची स्थापना करण्यात आली. 


2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1) मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. 

कारण - i) मानवी सुरक्षेला असणारे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद होय. 

ii) दहशतवादाचे लक्ष्यच सामान्य, निरपराध माणसे असतात. 

iii) या माणसांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.


2) प्रत्येक राष्ट्र स्वत:साठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. 

उत्तर : 

हे विधान बरोबर आहे. 

कारण - i) परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे. हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात. 

ii) त्यासाठी प्रत्येक राष्ट्राला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते. राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.


3) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणते वादग्रस्त प्रश्न नाहीत. 

उत्तर : 

हे विधान चूक आहे. 

कारण - i) स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

ii) जसे काश्मीरची समस्या, पाणी वाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद इत्यादी प्रश्नांवरून पाकिस्तानने भारतासोबत युद्ध केले आहे. यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत.


3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) जलद कृतिदलाचे कार्य

उत्तर : 

i) भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासांठी निमलष्कर दले असतात. 

ii) संरक्षण दलांना साहाय्य करणे हे या दलांचे प्रमुख काम असते. 

iii) निमलष्करी दलात जलद कृतिदलाचा समावेश होतो. या जलद कृतिदलाचे कार्य म्हणजे बाँबस्फोट, दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे असते.


2)  मानवी सुरक्षा

उत्तर : 

i) राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाशी सुरक्षा ही अंतिमत: माणसांसाठीच असते. 

ii) म्हणूनच मानवी सूरक्षा म्हणजे माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार होय. 

iii) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे. 

iv) निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे.


3) गृहरक्षक दल

उत्तर : 

i) स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल (होमगार्ड) ही संघटना स्थापन करण्यात आली. 

ii) गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास साहाय्यभूत ठरू शकतात. या दलात वीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री-पुरुष नागरिकांस भरती होता येते. 

iii) पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळात दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात.


4. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो ? 

उत्तर :

i) राष्ट्राराष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद, पाणी वाटपावरून वाद होऊन संघर्ष निर्माण होतात. 

ii) आंतरराष्ट्रीय करारांचे पालन न करणे, परस्परांशी सतत स्पर्धा करणे, शेजारी देशांतून निर्वासितांचे लोंढे येणे ही संघर्षाची कारणे निर्माण होतात. 

iii) राष्ट्रांमध्ये अशाप्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण तडजोडी, चर्चा यांच्या आधारे केले जाते, परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते. 

iv) एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे. या सर्व बाबींमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो.


2) सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा. 

उत्तर :

भारतातील निमलष्करी दलात सीमा सुरक्षा दलाचा समावेश होतो. सीमा सुरक्षा दलाची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.

i) सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. 

ii) सीमेजवळच्या भागातील विस्फोटक वस्तूंची तस्करी रोखणे. 

iii) सीमेवर गस्त घालणे. 


3) मानवी सुरक्षा म्हणजे काय ?

उत्तर : 

i) राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झाली आहे. 

ii) राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते. 

iii) माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. 

iv) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे.


5. दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. 

1) सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा. 

 सुरक्षा दलाचे नाव

कार्य  

प्रमुख  

सध्या कार्यरत प्रमुखात नावे 

 भूदल 

................... 

 ................... 

 ................... 

 ................... 

 ................... 

 अँडमिरल

 ................... 

 ................... 

 भारताच्या हवाई सीमा व अवकाश रक्षण करणे.  

 ................... 

 ................... 


उत्तर :

 सुरक्षा दलाचे नाव

कार्य  

प्रमुख  

सध्या कार्यरत प्रमुखात नावे 

 भूदल 

भौगोलिक सीमांचे संरक्षण करणे.   

 जनरल

बिपिन रावत 

 नौदल 

सागरी सीमांचे रक्षण करणे.  

 अँडमिरल

सुनिल लांबा

 वायुदल

 भारताच्या हवाई सीमा व अवकाश रक्षण करणे.  

 एअर चीफ मार्शल

बी. एस. धनोआ. 


2) भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या साहाय्याने दाखवा. 

उत्तर :

Previous Post Next Post