आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय
आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय इयत्ता नववी
आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र
1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
1) पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे.
अ) महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद
ब) कावेरी पाणीवाटप
क) निर्वासितांचे प्रश्न
ड) आंध्र प्रदेशातील नक्षलवाद
उत्तर :
निर्वासितांचे प्रश्न
2) पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.
अ) रोजगाराचा अधिकार
ब) माहितीचा आधिकार
क) बालकांचे अधिकार
ड) समान कामासाठी समान वेतन
उत्तर :
माहितीचा आधिकार
3) पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो ?
अ) शिक्षक दिन
ब) बालदिन
क) वसुंधरा दिन
ड) ध्वजदिन
उत्तर :
वसुंधरा दिन
2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
1) पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे
उत्तर -:
हे विधान बरोबर आहे. कारण - i) वातावरण प्रदूषित झाल्यामुळे किंवा तेलाच्या आणि वायुगळतीमुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका हा एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही.
ii) तसेच त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्यामुळे पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
2) निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात
उत्तर :
हे विधान चूक आहे. कारण - i) निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रावरचा बोजा अधिक वाढतो.
ii) जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते, गुन्हेगारीचे प्रमाण वाढते, महागाई वाढते.
iii) स्थानिकांच्या नोकऱ्यावर गदा येते, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे निर्वासितांना आश्रय देण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाही.
3. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
1) मानवी हक्क
उत्तर :
i) मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क होय.
ii) अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातं ,समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला होता. या हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणे गरजेचे आहे, या विचारला बळ मिळाले.
iii) मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो. हे हक्क मूलभूत असतात. हे हक्क सर्वांना प्राप्त होतील हे बघणे ही राज्याची जबाबदारी असते.
iv) मानवी हक्कांना आता जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
2) पर्यावरणीय ऱ्हास
उत्तर :
i) वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे, मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, पावसाचे प्रमाण कमी-जास्त होणे, तापमान वाढ, नद्या, तलाव आटणे, नद्या व समुद्राचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, आम्लपर्जन्य, ओझोन थराचे विरळ होणे यासर्वांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो.
ii) पर्यावरणीय ऱ्हासाचे दुषपरिणाम हे विशिष्ट राष्ट्रापुरते मर्यादित असले ता त्यांच्या दीर्घकालीन परिणामांमुळे त्या प्रश्नांना जागतिक स्वरूप प्राप्त होते.
3) दहशतवाद
उत्तर :
i) राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला 'दहशतवाद' असे म्हणतात.
ii) दहशतवाद म्हणजे संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय.
iii) वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबर अंतर्गत सुरक्षेलादेखील धोका निर्माण होतो.
iv) दहशतवाद ही जागतिक समस्या मानली जाते.
4. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर :
5. तुमचे मत नोंदवा.
1) मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा
उत्तर :
मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका -
i) भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आले आहे
ii) भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर आहे.
iii) १९१३ मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला. या कायद्यांतर्गत 'राष्ट्रीय मानवी हक्क आयोग' व 'राज्य मानवी हक्क आयोग' स्थापन करण्यात आले आहे.
iv) मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्यासंबंधात तक्रारींची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे.
2) दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा
उत्तर :
दहशतवादामुळे झालेले परिणाम -
i) दहशतवादामुळे समाजात अशांतता पसरते आणि विकासकार्यांना खीळ बसते.
ii) दहशतवादामुळे मोठ्या संख्येने जीवितहानी व वित्तहानी होते.
iii) दहशतवादामुळे अनेक सामाजिक व नैतिक समस्या निर्माण होतात.
iv) दहशतवादामुळे जातिवाद, प्रदेशवाद भाषावाद, जमातवाद यांसारख्या समस्या बळावतात.
v) दहशतवादामुळे सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत वाढ होते. प्रामुख्याने लहान मुले व तरुण पिढीचे योग्य सामाजिकरण न झाल्यामुळे ते असामाजिक कृत्यांकडे आकृष्ट होतात.
vi) देशाची जास्तीत जास्त शक्ती दहशतवादी कारवायांत खर्च होत असल्यामुळे नवीन उद्योग, नवीन विकास योजना व आर्थिक विकासाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. देशाच्या सर्वांगिण विकासाच्या मार्गांत अडथळे निर्माण होतात.
vii) दहशतवादामुळे महागाई वाढते. तसेच चोऱ्या, दरोडे, लुटमार, भ्रष्टाचार इत्यादी अनेक असामाजिक प्रकारांना प्रोत्साहन मिळते.
viii) दहशतवादामुळे समाजाचे व राष्ट्राचे ऐक्य धोक्यात येते.
ix) दहशतवादामुळे लोकशाही प्रणालीवर आघात होतो.
x) दहशतवादामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो.
दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय -
i) सामाजिक व आर्थिक विषमतेला आळा घालण्यासाठी ठोस उपाय अमलात आणले पाहिजे. त्यासाठी घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी अत्यंत प्रामाणिकपणे झाली पाहिजे.
ii) दहशतवादाची कारणे शोधून ती समुळ नष्ट करण्यासाठी सामाजिक व शासकीय स्तरावर आंदोलने केली पाहिजे.
iii) दहशतवाद्यांना कठोर शिक्षा मिळेल अशी कायदेशीर व न्यायीक प्रक्रिया केली जावी.
iv) प्रत्येक देशाच्या सीमेबाहरचा दहशवाद रोखण्यासाठी सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक व कार्यक्षम केली जावी.
v) विविध प्रसार माध्यमांच्या साहाय्याने दहशतवाद विरोधी प्रचार अभियान राबविले पाहिजे.
vi) दहशतवादविरोधी मानसिकता निर्माण करण्याच्या दृष्टीने शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणावेत.
vii) भाषिक व प्रादेशिक समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाय केले पाहिजे.
viii) देशाची एकता व अखंडता यांना बाधा येईल अशा कृत्यांना खंबीरपणे आळा घातला जावा.
ix) गरिबी व बेकारीचा प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न केले जावेत. तसेच रोजगार निर्माण केला जावा.
x) प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करून भ्रष्टाचारमुक्त अशी नि:पक्षपाती प्रशासन यंत्रणा निर्माण करावी.