भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.
उत्तर :
अ) भारत : i) अक्षवृत्तीय विस्तार : भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५' अक्षावरील 'इंदिरा पॉइंट' हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे.
ii) रेखावृत्तीय विस्तार : भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पूर्व रेखावृत्त ते ९७°२५' पूर्व रेखावृत्त आहे.
ब) ब्राझील : i) अक्षवृत्तीय विस्तार : ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त आहे.
ii) रेखावृत्तीय विस्तार : ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त आहे.