खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे. त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा.
MrJazsohanisharma

नाकतोडा - साप - भातशेती - गरुड - बेडूक 

उत्तर :

i. योग्य अन्नसाखळी:

भातशेती  नाकतोडा  बेडूक → साप  गरुड.

ii. वरील अन्नसाखळी भू-परिसंस्थेतील आहे.

iii. भू-परिसंस्थत अनेक प्रकारचे जैविक घटक असतात. जसे कीटक, पक्षी, सस्तन प्राणी इत्यादी. 

iv. उदाहरणात भातशेती म्हटले आहे याचा अर्थ ही परिसंस्था किनारपट्टीच्या जवळपास असावी भाताच्या शेतात पाणी साठलेले राहते. त्यामुळे तेथे बेडूक वास्तव्य करतात.

v. वरील अन्नसाखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत. प्राथमिक भक्षक नाकतोडा हा कीटक आहे. द्वितीय भक्षक बेडूक, तृतीयक भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे. या प्रत्येक पोषणपातळीवरच्या जैविक घटकावर जीवाणू कवक तसेच इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात. या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपातून ते थेट गरुडापर्यंतच्या पोषणपातळीत हस्तांतरित होते.

Previous Post Next Post