महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय इयत्ता नववी 

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय नववी


प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) इ. स. १९९२ मध्ये ................ या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली. 

अ) महाराष्ट्र

ब) गुजरात

क) आंध्र प्रदेश

ड) उत्तराखंड

उत्तर :

इ. स. १९९२ मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली. 


2) भारत सरकारने १९७५ मध्ये ................... यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. 

अ) डॉ. फुलरेणू गुहा

ब) उमा भारती

क) वसुंधरा राजे

ड) प्रमिला दंडवते

उत्तर :

भारत सरकारने १९७५ मध्ये डॉ. फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. 


प्रश्न. 2. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) सौदामिनी राव - स्त्रीमुक्ती आंदोलन समिती

2) विद्या बाळ - नारी समता मंच

3) प्रमिला दंडवते - महिला दक्षता समिती

4) ज्योती म्हापसेकर - महिला आयोग

उत्तर :

चुकीची जोडी : ज्योती म्हापसेकर - महिला आयोग


प्रश्न. 3. पुढील विधान सकारण स्पष्ट करा. 

1) स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली

उत्तर :

कारण - i) पूर्वापार चालत आलेली बंधनं, जोखडं झुगारून देऊन स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचा, तिच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करायचा हक्क मिळावा. 

ii) त्याही पुढे जाऊन एक माणूस म्हणून तिच्याकडे बघितले जावे यासाठी स्त्री मुक्ती चळवळीस सुरूवात झाली. 

iii) पूर्वी स्त्रियांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी स्त्री मुक्ती चळवळीस सुरूवात झाली.


2) १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला

उत्तर :

कारण - i) भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रांतून 'स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू, 'धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू' अशा बातम्या येत. याच्या खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले होते. 

ii) पोलिस, प्रशासन, न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या. यातून जनजागृती घडली. त्यामुळे १९८४ मध्ये 'हुंडाबंदी सुधारणा कायदा' करण्यात आला.


3) अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली

उत्तर :

कारण - i) संविधानाच्या १७ व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला. 

ii) स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा म्हणून त्यांना शिक्षणात व नोकऱ्यांत प्रतिनिधित्व देण्यात आले. या सर्व बाबींना अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायदयाने बंदी आणली.


4) संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत

उत्तर :

कारण - i) एखाद्या समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींच्या समूहाला अल्पसंख्यांक म्हणतात. 

ii) आपल्या देशात विविध धर्म, पंथ आणि भाषा असल्यामुळे भारतात सांस्कृतिक विविधता आहे. सांस्कृतिक परंपराही वेगवेगळ्या आहेत. 

iii) या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा. म्हणून संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.


प्रश्न. 6. टिपा लिहा. 

1) चिपको आंदोलन 

उत्तर :

i) १९७३ मध्ये चिपको आंदोलन घडून आले होते. या आंदोलनात स्त्रीशक्तीचा विधायक आविष्कार दिसून आला. 

ii) हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. या विरोधात चंडिप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले. 

iii) या आंदोलनात स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला 'चिपको आंदोलन' म्हणतात.


2) मानव अधिकार संरक्षण कायदा

उत्तर :

i) स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून १९९३ मध्ये हा कायदा करण्यात आला. 

ii) यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली. त्याच धतींवर काही राज्यांमध्ये 'राज्य मानवाधिकार आयोग' स्थापन झाले. 

iii) या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ अशा विविध गोष्टींवर कायद्याने प्रभावी भूमिका बजावून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली. 


प्रश्न. 5. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. 

1) स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा

उत्तर :

स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे पुढील उदाहरणांद्वारे स्पष्ट करता येईल.

अ) स्त्रीशक्तीचा आविष्कार : i) जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रियांनी १९७२ मध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद दाखवून दिली. 

ii) समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. 

iii) ऐन दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या. रॉकेल महाग झाले होते. यामुळे महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले. 

iv) या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजला.


ब) चिपको आंदोलन : i) १९७३ मध्ये चिपको आंदोलन घडून आले होते. या आंदोलनात स्त्रीशक्तीचा विधायक आविष्कार दिसून आला. 

ii) हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. या विरोधात चंडिप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले. 

iii) या आंदोलनात स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले. वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला 'चिपको आंदोलन' म्हणतात.


क) मद्यपानविरोधी आंदोलन : i) आंध्र प्रदेशात १९९२ मध्ये 'मद्यपान विरोधी चळवळ' सुरू झाली. 

ii) १९९२ मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुबागुंटा गावात तीन तरुण दारूच्या नशेत एका तळ्यात बुडून मरण पावले. 

iii) या घटनेच्या निमित्ताने गावातील महिला एकत्र आल्या. त्यांनी अरक (स्थानिक दारू) विक्रीचे दुकान बंद पाडले. ही बातमी स्थानिक वर्तमानपत्रात छापून येताच गावोगावी तिचा परिणाम झाला. 

iv) राज्यभर आंदोलन पसरल्याने सरकारने दारूविक्री विरोधात कडक धोरण स्वीकारले.


ड) इतर उदाहरणे : i) तसेच महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून सुरू झालेल्या भूदान चळवळीत विनोबांनी स्त्री शक्तीचा उपयोग केला. स्त्री कार्यकर्त्या भारतभर भूदानाचा विचार घेऊन गेल्या. 

ii) निजामशाही व सरंजामी व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मुक्तिलढ्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. हा भाग वेठबिगारमुक्त झाल्याने स्त्रियांची या संकटातून मुक्तता झाली. 

Previous Post Next Post