संकल्पना स्पष्ट करा शीतयुद्ध

संकल्पना स्पष्ट करा शीतयुद्ध

संकल्पना स्पष्ट करा शीतयुद्ध

उत्तर :

(i) दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. 

ii) या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधांमध्ये होता. 

iii) अर्थात प्रत्यक्ष युद्ध नाही पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करणे याला 'शीतयुद्ध' असे म्हणतात. 

iv) अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचारप्रणालीतील भेद, परस्परांना शह-काटशह देण्याची वृत्ती म्हणजे शीतयुद्ध होय. 

v) अर्थात दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत 

युनियन आणि अमेरिका या दोन महासत्ता उदयास आल्या होत्या. त्याच्यात असलेल्या तणावपूर्ण संबंधाला 'शीतयुद्ध' म्हटले जाते. 

Previous Post Next Post