एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते
उत्तर :
i) एखादया देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही.
ii) देशात प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल.
iii) म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. अशाप्रकारे एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ निश्चित केली जाते.