भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले
उत्तर :
जमीन महसूल हे इंग्रजांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते; परंतु इंग्रजांनी मात्र शेतसारा हा जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार आकारण्यास सुरुवात केली. तसेच शेतसारा रोख रकमेत व ठरावीक वेळेत शेतसारा भरावा, अशी सक्ती केली. जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे शोषण होऊ लागले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला पीक विकू लागला. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकरी शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घेऊ लागले. त्यामुळे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.