कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत
उत्तर :
कारण i) सर्वसाधारणपणे तास-दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण वेळ मानली जाते. परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय (पूर्व-पश्चिम) विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे नसते, त्यामुळे अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मानल्या जातात.
ii) कॅनडाचा पूर्व-पश्चिम रेखावृत्तीय विस्तार खूपच मोठा असल्याने एकच प्रमाण वेळ मानणे सोईचे होत नाही. म्हणून कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.