भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय इयत्ता नववी

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय इतिहास 


प्रश्न. 1. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या

उत्तर :

'आनंदपूर साहिब' या ठरावात अकाली दलाने पुढील मागण्या केल्या. चंदीगढ पंजाबला दयावे. इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत. सैन्यामधील पंजाबचे संख्याप्रमाण वाढवावे, पंजाब राज्यासअधिक स्वायत्तता द्यावी. 


2) जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे

उत्तर :

 सर्वांनी धार्मिक जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. 

i) त्यासाठी भिन्नधर्मीय लोकांत आपण मिसळले पाहिजे. उत्तर चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत. 

ii) परस्परांच्या सणउत्सवांत सहभागी झाले पाहिजे. 

iii) एकमेकांच्या चांगल्या चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहीजेत.  

iv) आपल्या सामाजिक वा आर्थिक प्रश्नांकडे आपणांस तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. हे सर्व जमातवाद नष्ट करण्यासाठी केले पाहिजे.


3) प्रदेशवाद केव्हा बळावतो

उत्तर :

i) 'प्रदेशवाद' म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय. 

ii) इतर प्रांतीयांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी भावना निर्माण होणे. हा अवाजवी प्रांताभिमान होय. 

iii) जेव्हा आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते तेव्हा प्रदेशवाद बळावतो.


प्रश्न. 2. टिपा लिहा

1) जमातवाद

उत्तर :

i) जेव्हा धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रुपांतर दरभिमानात होते. तेव्हा त्याला जमातवाद असे म्हणतात. 

ii) आपलाच धर्म श्रेष्ठ आणि इतर लोकांचा धर्माला कमी लेखणे यालाच जमातवाद असे म्हणतात. 

iii) अर्थात संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होता.


2) प्रदेशवाद

उत्तर :

i) प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय. 

ii) आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मियतेला अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. यालाच प्रदेशवाद म्हणतात. 

iii) आपल्या प्रांतावर प्रेम असणे स्वाभाविक आहे परंतु त्याचे विकृतीकरण नसावे. या विकृतीकरणातून प्रदेशवाद निर्माण होतो. 

iv) विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते.


प्रश्न. 3. का ते लिहा. 

1) ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले

उत्तर :

कारण - i) १९८० साली पंजाबमध्ये 'स्वतंत्र खलिस्तान' या चळवळीने मूळ धरले. 

ii) सुवर्णमंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेलसिंग भिंद्रानवाले याच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले. 

iii) या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. १९८१ मध्ये संपादक लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली. 

iv) भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्णमंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली. परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले. यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली. लोकशाहीसमोर हे मोठे आव्हान होते. म्हणून सुवर्णमंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन ब्लू स्ट करावे लागले.


2) जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे

उत्तर :

कारण - i) संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. 

ii) माणसामाणसांतील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक ऐक्यास तडा जातो.

iii) सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य साधणार नाही म्हणूनच जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.


प्रश्न. 4. पुढील संक्षिप्त रुपाचे पूर्ण रूप लिहा. 

1) MNF 

उत्तर :

मिझो नॅशनल फ्रॅट


2) NNC

उत्तर :

नागा नॅशनल कौन्सिल 


3) PLGA

उत्तर :

पीपल्य लिबरेशन गुरिला आर्मी

Previous Post Next Post