चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अत्यंत विश्वसनीय साधने मानली जातात.
उत्तरे :
चित्रफिती हे आधुनिक इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण दृक् -श्राव्य साधन आहे. लिखित साधने ही व्यक्तिनिष्ठ असू शकतात. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. चित्रफितीबाबत मात्र व्यक्तिनिष्ठता असत नाही. चित्रफितीमुळे घडलेली घटना जशीच्या तशी पाहता येते, त्यात बदल करणे शक्य नसते. म्हणून चित्रफिती इतिहासाच्या अभ्यासात विश्वसनीय साधने मानली जातात.