क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते

क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते

योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.

क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. 

हे विधान योग्य आहे. 

उत्तर :

कारण. - i) या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. 

ii) हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. 

iii) प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतली जाते. त्यासाठी त्यांचे साधारणतः ५ ते ७ गटांत वर्गीकरण केले जाते व प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात. ते वापरतांना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात. यावरून हे सिद्ध होते की क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. 

Previous Post Next Post