मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकाची नावे व त्यांचे कार्य विशद करा

मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकाची नावे व त्यांचे कार्य विशद करा

 

 

प्रश्न

मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकाची नावे व त्यांचे कार्य विशद करा

उत्तर

 

i) आपल्या शरीरात संप्रेरके या रासायनिक पदार्थांमार्फत समन्वय व नियंत्रण केले जाते. अंतःस्त्रावी ग्रंथीतून संप्रेरके स्त्रवतात. या ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असेही म्हटले जाते. 

ii) या ग्रंथीकडे त्याचा स्त्राव साठवण्यासाठी किंवा त्या स्त्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात. म्हणून ही संप्रेरके तयार होताच ती सरळ रक्तप्रवाहात मिसळली जातात. 

iii) या अंतस्त्रावी ग्रंथी शरीरामध्ये जरी ठरावीक ठिकाणीच असल्या तरी त्यांची संप्रेरके रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. 

iv) अंतस्त्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात. शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचे कार्य या दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात.


संप्रेरकाची नावे व त्यांची कार्ये - 

 संप्रेरके 

कार्य  

 1) पॅराथाॅर्मोन

शरीरातील कॅल्शिअम व फाॅस्फरसच्या चयापचयाचे नियंत्रण करणे.    

 2) थायमोसीन 

प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवणे.  

 3) थायरॉक्झीन 

शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे.  

 4) कॅल्सिटोनीन

कॅल्शिअमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शिअमचे नियंत्रण करणे. 


Previous Post Next Post