राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली

राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली

राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली ?

उत्तर : 

गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर भारतात आले तेव्हा त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना सरकारने अटक केली. सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले. सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी केली. राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. अखेर एप्रिल १९३४ मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली.



Previous Post Next Post