योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.
उत्तर- हे विधान अयोग्य आहे.
लोकसंख्येचे वितरण दाखविण्यासाठी टिंब पद्धतीचा नकाशा वापरतात.
कारण - i) दिलेल्या भौगोलिक घटकाच्या आकडेवारीनुसार एका टिंबाची किंमत ठरवावी लागते. दिलेल्या आकडेवारीनुसार ज्या प्रदेशात संख्यात्मक किंमत कमी असते तेथे टिंबाची संख्या कमी असते.
ii) त्यामुळे लोकसंख्येचे वितरण कोणत्या प्रदेशात जास्त आहे व कोणत्या प्रदेशात कमी आहे याचे नकाशावरून सहज ज्ञान होते.