समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत

समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत

योग्य की अयोग्य ते सकारण लिहा. 

समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे. 

कारण - समघनी नकाशांत समान मूल्ये दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले जातात. 

i) समघनी नकाशा काढताना घटकांचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते, जे रेषांमधील अंतर ठरवते. 

ii) ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात. त्यासाठी समान मूल्ये असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते. 

iii) सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. म्हणजेच यावरून हे सिद्ध होते की समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करतात.
Previous Post Next Post