नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली

नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली

 

 समस्येवर उपाय लिहा

प्रश्न

नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली.

उत्तर

 

उपाय - i) आपल्या घरातील टिव्ही, संगीत प्रणाली इत्यादीचा आवाज कमी ठेवावा, लग्न समारंभात बँड, फटाक्यांचा वापर टाळावा. 

ii) आपल्या परिसरातील घरे, कारखाने, वाहने इत्यादींतून होणारे धुराचे उत्सर्जन कमीत कमी ठेवावे. कचरा कचराकुंडीत टाकावा. तो जाळून त्याची विल्हेवाट लावू नये. 

iii) विहिरी, तलाव आणि सार्वजनिक कचरा नळ योजनेजवळ टाकू नये. निर्माल्य, मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव धरणात टाकू नये. 

iv) रासायनिक खतांऐवजी सेंद्रियखत वापरावे, पॉलिस्टरच्या कापडाऐवजी सुती कपड्यांचा वापर करावा, प्लॅस्टिक ऐवजी कागदाच्या पिशव्या वापराव्या.

v) अधिकाधिक वृक्ष लावून त्यांची जोपासना करावी. 

vi) प्रदूषणासंबंधित सर्व कायदे माहित करून त्यांचे पालन सर्वांनी करावे.


Previous Post Next Post