आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे

आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे

 

 भौगोलिक कारणे लिहा

प्रश्न

आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे

उत्तर


कारण - i) आतंरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. 


ii) आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वाराच्या समायोजनेच्या गरजेतून निर्माण झाली आहे. 


iii) आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक वा घडामोडींच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे. 


iv) जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. 


v) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते.

Previous Post Next Post