उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे काय ? कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेचे वर्गीकरण कशाच्या आधारे व कसे केले जाते ?

उत्तर :

ग्रहाच्या भोवताल उपग्रह भ्रमण करीत असतात. त्यांच्या भ्रमण मार्गाला भ्रमणकक्षा म्हणतात. पृथ्वीपासून उपग्रहाची भ्रमण कक्षा किती अंतरावर आहे त्यानुसार भ्रमण कक्षांचे वर्गीकरण केले आहे. जसे -

i) उच्च कक्षा : (भूपृष्ठापासून उंची > 35780 km) भ्रमणकक्षेचे अंतर 35780 km किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा कक्षेस उच्च कक्षा म्हणतात. 

या कक्षेतील ग्रहांना पृथ्वीभोवती फिरण्यास 24 तास वेळ लागतो. 

या कक्षेतून फिरणाऱ्या उपग्रहांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. 

ii) मध्यम कक्षा : (भूपृष्ठापासूनची उंची 2000 km ते 35780 km ) ज्या उपग्रहांची भ्रमण कक्षा उंची 2000 km ते 35780 km च्या दरम्यान असते अशा कक्षांना मध्यम कक्षा म्हणतात. 

iii) निम्न कक्षा : (उंची 180 km ते 2000 km) ज्या उपग्रहाच्या भ्रमणकक्षांची भूपृष्ठापासूनची उंची 180 ते 2000 असते अशा कक्षांना निम्न कक्षा म्हणतात. ही उपग्रह शास्त्रीय प्रयोगासाठी अथवा हवामान अभ्यासासाठी वापरले जातात. त्यांचा भ्रमण कालावधी जवळपास 90 मिनिटे असतो.  

Previous Post Next Post