वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे ? एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का ? का ?
उत्तर :
वजन | वस्तुमान |
i. वस्तूचे वजन म्हणजे, त्या वस्तूवर कार्य करणारे पृथ्वीचे गुरुत्व बळ होय. ii. वजन सदिश राशी आहे. iii. वजनाचे एकक : N dyne iv. वस्तुची जागा बदलल्यास तिचे वजन बदलते. |
एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच राहणार नाही. वस्तुमान कायम राहील मात्र वजन बदलेल. कारण वस्तुमान म्हणजे पदार्थातील द्रव्य संचय हा सर्वत्र तेवढाच राहील तर वजन = mg होईल.
येथे g म्हणजे त्या ग्रहाचे गुरुत्वीय त्वरण. गुरुत्वीय त्वरण त्या ग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ग्रहाची वस्तुमाने भिन्न असल्यामुळे, त्या ग्रहासाठी g भिन्न राहील म्हणून वजन भिन्न राहील.