थोडक्यात टिपा लिहा आधुनिक आवर्तसारणीची रचना

थोडक्यात टिपा लिहा आधुनिक आवर्तसारणीची रचना

थोडक्यात टिपा लिहा आधुनिक आवर्तसारणीची रचना

उत्तर :

आधुनिक आवर्तसारणी मध्ये - 

i) सात आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्तने म्हणतात. 

ii) अठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात. 

iii) आडव्या उभ्या रांगामुळे चौकटी तयार होतात. प्रत्येक चौकटीत एक एक याप्रमाणे मूलद्रव्याची नावे व  अणू अंक लिहिलेले असतात. 

iv) तळाशी आणखी दोन ओळी आहेत. त्यांना लॅन्थचनाइड व ऑक्टिनाइड श्रेणी म्हणतात. 

v) एकूण 118 चौकटीत, प्रत्येक चौकटीत एक प्रमाणे 118 मूलद्रव्ये दाखविली आहेत. 

vi) संपूर्ण आवर्त सारणी चार खंडात विभागली आहे. 

  S खंड 

गण 1 व गण 2  

 P खंड 

 गण 13 ते गण 18 

 D खंड 

 गण 3 ते गण 12 

 F खंड 

 तळाच्या तीन ओळी


vii) नागमोडी रेषा - P खंडातून एक नागमोडी रेषा जाते ह्या रेषेच्या डाव्या अंगास धातू तर उजव्या अंगास अधातू व रेषेच्या किनारी धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. 

viii) यातील सर्व मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणू अंकानुसार केलेली आहे.   

Previous Post Next Post